नाशिक

निमोणचा पशुवैद्यकीय दवाखाना कायमस्वरूपी डॉक्टराविना

CD
निमोणचा पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टराविना पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त; नियमित सेवा मिळेना सकाळ वृत्तसेवा चांदवड, ता. ८ : तालुक्यातील निमोण येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात तीन-चार वर्षांपासून कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी अर्थात, पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून संबंधित दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्याने जनावर आजारी पडल्यास उपचारासाठी खासगी पशुवैद्यकांची मदत घ्यावी लागत आहे. निमोण परिसरासह लगतच्या गावांत मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेतीसह दुग्धव्यवसाय व पशुपालन करतात. मात्र, शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नियमित डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनावरांच्या आरोग्याची जबाबदारी पशुपालकांवरच येते. जनावर अचानक आजारी पडल्यास अथवा प्रसूती, लसीकरण, उपचार, औषधोपचार यासारखी तातडीची गरज निर्माण झाल्यास शासकीय सेवा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात आहे. पाणी, चारा आणि जनावरांच्या देखभालीचा खर्च वाढलेला असताना जनावर आजारी पडल्यास खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे शासनाने उपलब्ध करून दिलेली पशुवैद्यकीय सेवा प्रत्यक्षात मिळत नसल्याने पशुपालकांमध्ये नाराजी वाढली आहे. निमोणच्या दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार ज्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे आहे, तेही नियमितपणे उपलब्ध राहत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त कार्यभार देऊनही प्रत्यक्षात पशुपालकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळत नसल्याचा आरोप होत आहे. शासकीय दवाखाना असूनही डॉक्टर उपलब्ध नसतील, तर आम्ही जनावरांना उपचारासाठी कुठे घेऊन जायचे, असा सवाल उपस्थित होत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी निमोण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तातडीने कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी नियुक्त करावा. तोपर्यंत अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्याची नियमित उपस्थिती सुनिश्चित करून पशुपालकांना सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच नियुक्ती असूनही अधिकारी नियमितपणे सेवा देत नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

Latest Marathi News Live Update: दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

SCROLL FOR NEXT