नाशिक

जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल स्कूलची दुहेरी उपविजेतेपदाची कामगिरी!

CD
पान-३ २६९७८ येवला : जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत उपविजेते पद पटकावलेले विद्या इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी. ------------ ३०-२ विद्या इंटरनॅशनल स्कूलला नेटबॉलचे दुहेरी उपविजेतेपद सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२ : जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल स्कूलने दुहेरी उपविजेतेपदाची कामगिरी बजावली. विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद पटकावले. उपांत्यपूर्व सामन्यात विद्या इंटरनॅशनलच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर ४–१ अशी दमदार मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात देवळाली हायस्कूलच्या संघाविरुद्ध विद्या इंटरनॅशनलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्रथमच जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवत थेट अंतिम फेरी गाठली आणि उपविजेतेपद मिळवून पदार्पणाची शानदार नोंद केली. पुढील वर्षी अधिक जोमाने, नियोजनबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर पुन्हा जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद मिळविण्याचा निर्धार खेळाडूंनी केला आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल, डॉ. संगीता पटेल, प्राचार्य सौ. शुभांगी शिंदे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघाला क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT