NSK26H34492
जळगाव : छावा मराठा युवा महासंघाच्या महानगराध्यक्षा विद्या झनके यांना नियुक्तिपत्र देताना प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे.
-------
छावा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर
महानगराध्यक्षपदी विद्या झनके
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : येथील छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव महानगर महिला आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात महानगराध्यक्षपदी विद्या सुभाष झनके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झनके या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सचिव, केंद्रीय शिक्षिका म्हणून कार्यरत असून, गेल्या तीन वर्षांपासून छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या संघटनात्मक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर आता महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी नियुक्ती विषयी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांना प्रदान केले आहेत. त्यानुसार कोल्हे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन जळगाव महानगर महिला आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
चौकट
इतर कार्यकारिणी अशी
महानगर उपाध्यक्ष : ममता जावळे, संध्या तायडे, जयश्री सोनवणे, शारदा तायडे, महानगर सचिव : सपना कोळी, वैशाली ठाकूर, ज्योती सिंगनाथ. महानगर सहसचिव : उज्ज्वला सपकाळे, रूपा पाटील, ज्योती खरे. कार्यकारिणी सदस्य : योगिता सुतार, ऊषा इंगळे, प्रमिला इंगळे, आरती सकट, मीनाक्षी खैरनार, विजया राऊत. कायदेविषयक सल्लागार : ॲड. वनिता शिंपी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.