The filth strewn in the school verandah, as well as liquor bottles lying around esakal
नाशिक

NMC School: विद्यामंदिर बनले मधुशाला! हुंडीवाला लेन येथील महापालिकेच्या शाळेत मद्यपींचा वावर

सकाळ वृत्तसेवा

NMC School : हुंडीवाला लेन येथील बंद अवस्थेत असलेल्या विद्यानिकेतन महापालिका शाळेचे विद्या मंदिरातून मधुशालेत रूपांतर झाले आहे. रात्रीच्या वेळेस शाळेचा मद्यपींकडे ताबा असतो. आवारात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.

ठिकठिकाणी पडून असलेल्या मद्याच्या बाटल्या येथे मद्यपींचा वावर असल्याचे साक्ष देत आहेत. (Vidyamandir became liquor den Drunken behavior in municipal school at Hundiwala Lane nashik)

महापालिका जिजामाता रुग्णालयासमोर हुंडीवाला लेन येथे महापालिकेची विद्यानिकेतन शाळा आहे. पूर्वी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी या शाळेत शिक्षण घेतलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा बंद आहे.

मध्यंतरी काही दिवस त्याठिकाणी मुलींचे वसतिगृह होते. शालिमार येथे वसतिगृहाची इमारत झाल्यानंतर वसतिगृह मूळ ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यानंतर आजपर्यंत शाळा बंद आहे. महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने आवारात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे.

गाजरगवत वाढले आहे. मद्यपी आणि भद्रकाली परिसरातील फिरस्त्या गावगुंडांकडून शाळेचा वापर केला जातो. शाळेच्या आवारात वर्गांमध्ये मद्याच्या पार्ट्या रंगत असतात. पार्टी झाल्यानंतर बाटल्या तेथेच फेकून दिल्या जातात.

किती मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर आहे, याची साक्ष त्या बाटल्या देतात. त्याचप्रमाणे अमलीपदार्थाचे सेवन करणाऱ्यांचाही वावर दिसून येतो. अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढून परिसरातील नागरिकांना आरोग्यासह विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकेकडून याकडे लक्ष देऊन पुन्हा शाळा सुरू करण्यात यावी. तसे करणे शक्य नसेल तर मुख्य बाजारपेठेत महापालिकेची वास्तू असल्याने त्याचा पुनर्विकास करावा. शाळा पाडून त्याठिकाणी महापालिकेचे व्यावसायिक संकुल तयार करण्यात यावे.

असे झाल्यास त्यातून महापालिकेचे उत्पन्नवाढीस मदत होईल. याशिवाय बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह निर्माण करता येऊ शकते अशा विविध बाबींची पूर्तता करावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

Maharashtra Politics: गणेश नाईकांचं 'ते' विधान अन् 14 गावांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

SCROLL FOR NEXT