Expired Fire Safety Cylinders at Vidyut Bhavan Office
Expired Fire Safety Cylinders at Vidyut Bhavan Office esakal
नाशिक

Nashik News: नाशिक रोडचे विद्युत भवन सलाईनवर! फायर सेफ्टीची एक्स्पायरी संपली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड येथील एमएसईबी मुख्य कार्यालय म्हणून ओळखले जाणारे विद्युत भवन सध्या सलाईनवर आहे. फायर सेफ्टी इन्स्ट्रुमेंटची एक्स्पायरी २०१५ व २०२० ला संपलेली असताना हे फायर सेफ्टी इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी लावण्यात आल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (Vidyut Bhawan of Nashik Road Fire safety expired Nashik News)

नाशिक रोड येथील विद्युत भवन येथे महावितरणचा मुख्य कारभार चालतो. सर्व अधिकारी याच ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी आधीपासून संरक्षण मिळवायला बसवलेले इन्स्ट्रुमेंट कालबाह्य झालेले आहे.

या ठिकाणी आग लागल्यावर सेफ्टीसाठी बसवलेले लाल सिलिंडर २०१५ व २०२० ला एक्स्पायर झाले असल्यामुळे आधीपासून सुरक्षिततेचा प्रश्न विद्युत भवन कार्यालयात निर्माण झाला आहे.

येथील कर्मचारी आणि अधिकारी हायरस्क झोनमध्ये काम करत असल्याचा निर्वाळा नागरिकांनी दिला आहे. सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनेक लोक महावितरणच्या या बेजबाबदार कारभारावर चर्चा करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"फायर सेफ्टी संदर्भात माहिती घेऊन बोलणे महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठांशी बोलून या संदर्भात तांत्रिक बाजू तपासून खुलासा केला जाईल."

- विकास आढे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

"या इमारतीमधील सर्वच अधिकारी कर्मचारी हाय रिस्क झोनमध्ये काम करत आहे. फायर सेफ्टी केली आहे का, दरवर्षी ऑडिट होते का, फायर सेफ्टीचे या सिलिंडरची मुदत २०१५ व २० ला संपलेली आहे." - संदीप जगझाप, तक्रारदार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : साताऱ्यात आतापर्यंत शशिकांत शिंदे 7202 मतांनी आघाडीवर

Loksabha Election Results 2024: "हा फक्त ट्रेलर...!" PM मोदी वाराणसीमध्ये ५ हजार मतांनी पिछाडीवर; जयराम रमेश यांचा गर्भित इशारा

India Lok Sabha Election Results Live : कोण उधळणार गुलाल.... PM मोदींनी पुन्हा घेतली आघाडी

Lok sabha nivadnuk nikal 2024 : काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर; इंडिया आघाडी अनपेक्षित यशाकडे

Lok Sabha Election Result: 400 पारचा नारा स्वप्नच? NDA च्या जागा होतायत कमी, इंडिया आघाडीची जोरदार टक्कर

SCROLL FOR NEXT