jewelry shopping
jewelry shopping esakal
नाशिक

Vijayadashami 2022 : सोने खरेदीसाठी नाशिककरांची एकच गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्‍या दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात ‘सोनं’ एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. या दसऱ्याचा मुहूर्त साधत नाशिककरांनी सोने खरेदीला विशेष पसंती देत खरेदी केली. यामुळे शहरातील सराफी पेढ्या, मोठी सोने, चांदीचे दालनावर खरेदीसाठी एकच गर्दी झाली. तयार दागिन्यांसह चोख सोने खरेदीकडे आजच्या दिवशी विशेष कल दिसून आला. दसऱ्यानिमित्त सोने खरेदीत मोठी उलाढाल झाली.

निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्याने सोने खरेदी करताना कुठल्याही प्रकारची घाई ग्राहकांकडून व विक्रेत्यांकडून होत नसल्याने मनसोक्त ग्राहकांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला.

दसऱ्यानिमित्त महिला वर्गाकडून खास तयार दागिन्यांना पसंती देण्यात आली, तर तरुणीकडून खास हलक्या व आकर्षक डिझाईनमध्ये घडविण्यात आलेल्या तुर्की डिझाईनमध्ये घडविण्यात आलेल्या दागिन्यांना विशेष मागणी होती. सोन्याच्या दरदेखील आवाक्यात असल्याने आणि येत्या काही दिवसांवर आलेली दिवाळी व लग्नसराई लक्षात घेता विजयादशमीचा मुहूर्त साधून खरेदी अनेकांनी सोन्याची खरेदी केली.

यासह या दिवशी अनेकजण नियमित सोने खरेदी करत असल्याने त्यांच्याकडूनदेखील चोख सोने खरेदीला मोठी मागणी होती. यामध्ये बिस्कीट, सोन्याची शिक्के, लगडी, वेढे याची खासकरून खरेदी झाली. दसरा साजरा करताना सोन्यात घडवलेली आपट्यांच्या पानेदेखील खरेदी केली जात होती.

"यंदाचा दसरा हा निर्बंधमुक्त साजरा करण्यात येत असल्याने विजयादशमीचा मुहूर्त साधत नाशिककरांकडून सोने खरेदीला मोठी गर्दी करण्यात आली. खासकरून तयार दागिने आणि चोख सोने खरेदीकडे सर्वांचा कल होता. यातच सोन्याच्या दरात आवाक्यात असल्याने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला." - मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' कोहलीने कारकिर्दीवर केलं मोठं विधान

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Alert: तुमच्या फोनमधील प्री-इंस्टॉल असलेले ॲप्स वेळीच करा डिलीट,अन्यथा ...

SCROLL FOR NEXT