नाशिक

विश्व हिंदू परिषद- बजरंग दलातर्फे जळगावात ''शस्त्र पूजन'' सोहळा

CD
ॲंकर NSK26H33191 जळगाव : विजयादशमी उत्सवानिमित्त विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे मंगळवारी आयोजित शस्त्रपूजन सोहळ्यास उपस्थित मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, उज्ज्वल निकम, अशोक जैन आदी. ------ विश्व हिंदू परिषद- बजरंग दलातर्फे ''शस्त्रपूजन'' सोहळा उपशीर्षक मंत्री गिरीश महाजनांसह मान्यवर उपस्थित सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : येथील पांडे चौक परिसरात काल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जळगाव महानगर यांच्या वतीने विजयादशमीच्या (दसऱ्याच्या) शुभमुहूर्तावर पारंपरिक ''शस्त्र पूजन'' सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात हिंदू संस्कृतीच्या परंपरेनुसार गदा, तलवार, भाला या पारंपरिक शस्त्रांची विधीवत मांडणी करून त्यांचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, राज्यसभा सदस्य ॲड. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ उद्योजक अशोक जैन, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, डॉ. उल्हास पाटील , महापौर दीपमाला काळे, माजी महापौर ललित कोल्हे आदी उपस्थित होते. या वेळी धार्मिक क्षेत्रातील आध्यात्मिक मार्गदर्शक हरिभक्त परायण गजानन महाराज वरसाळेकर आणि हरिभक्त परायण समाधान महाराज भोजेकर यांनी आशीर्वचन दिले. केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, ''आयएमए''चे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, श्रीराम रथोत्सव समितीचे भालचंद्र पाटील, पिंप्राळा रथोत्सव समितीचे मोहन वाणी व अनिल वाणी, नगरसेवक अनिल अडकमोल, अरविंद देशमुख, सुचिता हाडा, उज्ज्वला बेंडाळे आणि ओम त्रिवेदी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे, प्रांत सहमंत्री ललित चौधरी, विभाग मंत्री देवेंद्रजी भावसार, जिल्हाध्यक्ष हरीशभाई मुंदडा, जिल्हा मंत्री राकेश लोहार आणि महानगर अध्यक्ष डॉ. मनीष चौधरी आदी उपस्थित होते. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT