Modi Government Vikasit Bharat Sankalp Rath (File Photo) esakal
नाशिक

Viksit Bharat Sankalp Yatra: ‘विकसित भारत संकल्प’ रथ रोखल्याप्रकरणी देवळा गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ देवळा तालुक्यात अडविण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

Viksit Bharat Sankalp Yatra : केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ देवळा तालुक्यात अडविण्यात आला होता. काही दिवस हा रथ उभा होता.

त्यास फिरकू दिले नाही. या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेत देवळा गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. (Viksit Bharat Sankalp Yatra Notice to Deola Group Development Officers in connection with blocking rath nashik news)

महापालिका आणि जिल्हा परिषदांवर प्रशासकीय राज आहे. अशा स्थितीत योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचतोय किंवा नाही, याबाबतची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच १७ प्रकारच्या विविध शासकीय योजनांची जगजागृती करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले. तालुकानिहाय ग्रामपंचायतींत यात्रा जात आहे. आतापर्यंत एक हजार ३८८ पैकी ५४६ ग्रामपंचायतींतर्गत गावांमध्ये यात्रा पोहोचली.

गावा-गावांमध्ये यात्रा जात असताना काही गावांमध्ये यात्रेला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. देवळा तालुक्यातील काही गावांमध्ये रथ अडविण्यात आला. तब्बल सात दिवस रथ येऊ दिला नाही. केंद्र सरकारच्या जनसंपर्क विभागातर्फे या यात्रेचे आयोजन केले आहे. मात्र, त्यास विरोध होत असल्याने त्यांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली.

त्यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गावांमध्ये यात्रा रोखली जात असून, त्यांची कारणे ही प्रशासकीय नसून, राजकीय आहेत. यात्रा ही केंद्र सरकारची असल्याने गावांतील लोकांनी ती रोखता कामा नये. ज्यांचा विरोध आहे, त्यांनी यात्रेत सहभागी होऊ नये, यावरही यात्रा रोखली गेल्यास रोखणाऱ्यांविरोधात संबंधित प्रांत, तहसीलदार, तलाठी यांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले होते.

त्यानंतर ग्रामपंचायतींतर्फे देवळा गटविकास अधिकाऱ्यांना रथ प्रकरणी नोटीस काढण्यात आली. त्याबाबत त्यांना सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले असल्याचे नोटिशीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT