नाशिक

विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी विलास सुर्यवंशी तर उपाध्यक्षपदी विजय जाधव नाशिकची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत

CD
फोटो : B07508 नाशिक : विलास सूर्यवंशी यांच्या निवडीबद्दल सत्कार करताना संदेश देवकर, बाळासाहेब दिघे, विजय जाधव व पदाधिकारी विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी विलास सूर्यवंशी नाशिक, ता. २ : नाशिकच्या विश्वकर्मा मंदिर ट्रस्टची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री विश्वकर्मा भवन येथे पार पडली. २०२६-२७ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. विलास सूर्यवंशी यांची अध्यक्षपदी, विजय जाधव यांची उपाध्यक्षपदी, राजेंद्र भालेराव यांची सचिवपदी, प्रवीण गाडेकर यांची खजिनदारपदी तर संदेश देवकर यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली. अरविंद जाधव, दशरथ शिरसाठ, तसेच विश्वस्त मंडळाच्या हस्ते श्री विश्वकर्मा पूजन झाले. सचिव राजेंद्र भालेराव यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. विश्वस्त प्रज्ञा भालेराव यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. तसेच ट्रस्टच्या आर्थिक वर्षातील जमा-खर्चाचा तपशील व ताळेबंद विश्वस्त बाळकृष्ण दिघे यांनी सभेसमोर सादर केला. यावर उपस्थित सभासदांनी साधक-बाधक चर्चा करून काही दुरुस्ती व सूचना मांडल्या. या वेळी श्री विश्वकर्मा भवनच्या बांधकामाचा आढावाही सभेसमोर मांडण्यात आला. चर्चेत अरविंद जाधव, प्रकाश दिघे, सचिन सूर्यवंशी, चंद्रकांत हिरे, लक्ष्मण निरखे, ॲड. अनिल शिरसाट, लक्ष्मण आहेर, गणेश पगार आणि प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सहभाग घेत विविध सूचना मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT