Protest banners put up by the farmers' association protesting the decision to purchase tomatoes by Nafed. esakal
नाशिक

Tomato Crop: बागलाणमध्ये गावोगावी निषेधाचे बॅनर; शेतकरी संघटनेकडून नाफेडतर्फे टोमॅटो खरेदीचा निषेध अन टीकाही

सकाळ वृत्तसेवा

Tomato Crop : शहरातील ग्राहकांना खूष करण्यासाठी स्वस्त दरात टोमॅटो उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने १५ जुलैपासून नाफेड मार्फत टोमॅटो खरेदी करत तो विकण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी विरोधी आहे. (Village to Village Protest Banners in Baglan Protest and criticism of purchase of tomato by NAFED from farmers association Nashik)

केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध बागलाण तालुका शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त करत या जाचक निर्णयास केंद्र शासनाला दोषी धरत जाहीर निषेधही केला आहे. यासह संघटनेतर्फे गावोगावी या आशयाचे बॅनर लाऊन नाराजी देखील व्यक्त केली.

संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी म्हणाले, गेली दोन-तीन वर्षे कोणत्याही शेतमालाला भाव नाही. कधी टोमॅटोचा लाल चिखल होतो तर कधी कांद्याची नासाडी होते. तरीही सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही.

जणू काही सरकारने शेतकऱ्यांना व एकूणच त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन वाढले म्हणून दोन रुपये किलो मातीमोल दराने विक्री करणे किंवा रस्त्यावर फेकून देणे भाग पडले.

मात्र टोमॅटोचे बऱ्यापैकी दर वधारल्या बरोबर सरकारने लगेच नाफेड मार्फत खरेदी करून ग्राहकांना स्वस्त दरात विकण्याची घोषणा केली. यावरून सरकारचे दुटप्पी धोरण लक्षात येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जेव्हा कांदे उकिरड्यावर फेकले जातात, टोमॅटो रस्त्यावर ओतले जातात तेव्हा हे सरकार काहीही करत नाही आणि ग्राहकांना थोडं महाग मिळाल्याबरोबर केंद्र सरकारकडून शेतकरी हिताविरोधी निर्णय घेते.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सर्वच ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध केला जात आहे. बागलाण तालुका शेतकरी संघटनेतर्फे आम्ही या आशयाचे फलक लावून सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

बागलाण तालुका शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, वैभव अहिरे, भास्कर बागूल, भिका सूर्यवंशी, उमेश खैरनार, वसंत जाधव, नानाजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, घनश्याम जाधव, सोमनाथ जाधव, महेंद्र जाधव, रूपेश जाधव, रमेश जाधव, बाबूराव जाधव, त्र्यंबक जाधव, चेतन पवार, जगदीश आहिरे, विनोद जाधव, चेतन पवार, सुशांत जाधव, गौरव शेवाळे, शिवजी जाधव, कार्तिक जाधव, शरद जाधव, आदी शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT