Nashik News esakal
नाशिक

Nashik News: अबब! गावकऱ्यांनी अख्ख गावच विकायला काढलं, कारण...

सकाळ वृत्तसेवा

देवळा : कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ माळवाडी (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ६) गावातील सभामंडपात एकत्र जमत संपूर्ण गावच शासनाला विकण्याचा ठराव केला. यामुळे कांद्यासह इतर शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकरीवर्ग उद्विग्न अन्‌ वैफल्यग्रस्त होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

माळवाडी गावातील शेतकरी सुमारे ५३४ हेक्टरवर शेती व्यवसाय करतात. त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जाते. गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणत्याही शेतमालाला अपेक्षित दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.

शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा पैसाही शेती व्यवसायात उपलब्ध होत नसल्याने आर्थिक समीकरणे कोलमडून गेली आहेत. दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँकांची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नसल्याने माळवाडीतील ग्रामस्थांनी एकत्रित येत संपूर्ण गाव विकण्याचा ठराव केला.

शासन शेतकरीहितापेक्षा ग्राहकहिताला प्राधान्य देत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पण आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून मिळणाऱ्या पैशांत तरी जगता येईल, या उद्वेगातून हा ठराव करण्यात आला.

शासनाने शेतकऱ्यांच्या गरजा भागवणे व कर्जमुक्त करण्याइतका तरी शेती उत्पादित मालाला भाव मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे आणि ते सरकारने विकत घ्यावे, अशी मागणी शेतकरी प्रवीणअण्णा बागूल, अमोल बागूल, राकेश सोनवणे, अविनाश बागूल, अक्षय शेवाळे आदी शेतकऱ्यांनी केली. त्यास गावातील इतर शेतकऱ्यांनी दुजोरा देत पाठिंबा दर्शविला.

''कुठल्याही शेतीमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा जमिनी विकून जगता यावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ एकमताने गाव विकण्याचा ठराव करीत आहोत. केंद्र व राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हाला पैसे उपलब्ध करून द्यावा.'' - प्रवीण बागूल, युवा शेतकरी, माळवाडी, ता. देवळा

या वेळी सर्वानुमते ठराव पास करण्यात आला. त्यावर संदीप बच्छाव, शिवाजी बागूल, प्रशांत बच्छाव, वैभव बच्छाव, महेश बागूल, महेंद्र बागूल, उदय बागूल, रोहन बागूल आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

AMIM-BJP Alliance : अकोटमध्ये 'एमआयएम-भाजप भाऊ-भाऊ'; आमदार साजिद खान पठाण यांनी पुराव्यासह केला पर्दाफाश!

Mangalwedha ST Depot : मंगळवेढा एसटी आगाराची जिल्ह्यात 'पहिली' झेप; १० लाखांच्या उत्पन्नासह सोलापूर जिल्ह्यात अव्वल!

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT