villagers locked MLA Dilip Borse in the Gram Panchayat office due to power outage Nashik Marathi News  
नाशिक

शेतकऱ्यांचा उद्रेक! आमदारांना कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात; पाहा VIDEO

रोशन भामरे

तळवाडे दिगर  (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात मागील सलग पाच दिवसांपासून झालेली तुफान गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान गारपीटीने त्रस्त असलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे महावितरन कंपनीने वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांचा भावनांचा उद्रेक झाला.  

बागलाण तालुक्यातील केरसाने परिसरावर कोपलेल्या निसर्गामुळे उन्हाळ कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल  (ता. २३) पुन्हा  करसाने परिसरात तुफान गारपीट झाली आहे दरन्यान बागलाणचे आमदार दिलीप बोरसे  हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असतांना हा प्रकार घडला. त्यांना केरसाणे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.

अन् लगेच चक्रे फिरली...

एकीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन जोडले जात नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला. महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा यावेळी ग्रामस्थांनी निषेध केला. दरम्यान, बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातूनच तातडीने चक्रे फिरवीत तात्काळ विजजोडणी करा असे आदेश दिल्यानंतर महावितरणने विजजोडणी सुरू केल्यानंतर  ग्रामस्थांनी आमदार दिलीप बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर सोडले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT