tree plantation on road  esakal
नाशिक

Nashik News : रस्त्यावरून खडतर प्रवास नाकीनऊ...ग्रामस्थांनी केले खड्डयात वृक्षारोपण

दीपक खैरनार -सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रोज मरे...त्याला कोण रडे, अशीच काहीशी परिस्थिती गावापासून ते निमधरा फाटा व मालेगाव तालुक्याच्या हद्दीपासून काकडगावपर्यंत रस्त्याची झाली आहे.

वारंवार संबंधित यंत्रणेला विनवूनही रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील संतप्त नागरिकांनी बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करीत खड्ड्यात वृक्षारोपण केले.(villagers planted trees in potholes due to bad road condition nashik news)

मालेगाव हद्दीपासून ते काकडगावपर्यंत रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांसह शेतीशिवारातील शेतकरी जीव धोक्यात घालून खड्ड्यातून खडतर प्रवास करीत आहेत. याकडे जाणीवपूर्वक बांधकाम विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांबाबत लोकप्रतिनिधी व यंत्रणेला काहीही घेणेदेणे नसल्याचे यावरून दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वीच शिवबाण फाटा, काकडगावाजळील भारत गॅस गोडाऊनजवळील रस्त्यावर व स्टेट बँकेसमोर मोठ्या प्रमाणावरील खड्ड्यात मुरूम खडी टाकून रस्त्यावर डागडुजी संबंधित विभागाकडून करण्यात आली होती मात्र आता या रस्त्यावर खडी उचकटून पडल्याने प्रवास करणे अवघड होऊन बसले आहे.

उचकटून पडलेल्या खड्यांमुळे दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बर्‍याच दुचाकीवरून प्रवास करणा-या दुचाकीला खडीचा कट लागल्यास दुचाकी पंचर होण्याचे प्रमाण वाढले असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान या रस्त्याच्या साईटपट्टीवरून जाणे बरे पण डांबर रस्त्यावरून प्रवास नको रे बाबा, असे दुचाकीस्वारांकडून बोलले जात आहे.

रस्त्यावरील धोकादायक ठरत असलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येथील चंद्रकांत कोर, संजय कोर, रामदास आहिरे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष भावराव भामरे, योगेश कोर, तात्याभाऊ कोर, मिलिंद कोर, दिपक मैंद, सचिन आहिरे, राजेंद्र कोर, योगेश कोर, दावल कोर यांनी गांधीगिरीने रस्त्यावर उतरून खड्ड्यात वृक्षारोपण केले व यंत्रणेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

''गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असतांनाही बांधकाम विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. सदर यंत्रणा अंधळी आणि बहिरी झाल्याचे दिसून येत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावर मोठा अपघात घडल्या बांधकाम विभाग जबाबदार राहिल.''-चंद्रकांत कोर, तालुका संघटक शिवसेना (ठाकरे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT