Coffins in Sub zila Hospital Mortuary. esakal
नाशिक

Nashik : मृतदेहावर मुंग्या फिरत असल्याची Video Viral!

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनानंतर शवागृहात ठेवलेल्या मृतदेहावर अक्षरशः मुंग्या फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल आरोग्य प्रशासनाने दुजोरा दिला नाही. (Viral video of ants walking on dead body at manmad Nashik Latest Marathi News)

शहरातील २५ वर्षीय तरुणीने शनिवारी (ता. ८) गळाफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मनमाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मनमाड पोलिसांनी तरुणीचा मृतदेह विच्छेदन करण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. नंतर अंतविधी करण्याचे रात्री ठरल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंधार पडल्यानंतरही तातडीने शवविच्छेदन केले. मात्र, मृताच्या नातेवाइकांनी अंत्यविधीची वेळ बदलून दुसऱ्या दिवशी अंत्यविधी करण्याचे ठरविले.

यामुळे त्या रात्री मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्येच ठेवला व सकाळी तो ताब्यात घेण्यासाठी आले असता, मृतदेहाला मुंग्या लागल्या असल्याचे चित्र नातेवाइकांना पाहावयास मिळाले. यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला असला, तरी याप्रकरणी कोणतीही तक्रार दिली नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन वारके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT