Yashwantrao Chavan Maharashtra Open University Founder Vice-Chancellor Prof. Speaking at the condolence meeting of Ram Takwale, Vice Chancellor Dr. Sanjeev Sonwane
Yashwantrao Chavan Maharashtra Open University Founder Vice-Chancellor Prof. Speaking at the condolence meeting of Ram Takwale, Vice Chancellor Dr. Sanjeev Sonwane esakal
नाशिक

Dr. Ram Takawale: दूरदृष्टिकोन असलेला शिक्षणतज्‍ज्ञ हरपला; डॉ. राम ताकवले यांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

Dr. Ram Takawale : तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने समाजाच्‍या प्रत्‍येक घटकापर्यंत शिक्षण नेण्याचा ध्यास डॉ. राम ताकवले यांनी बाळगला होता. शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्‍यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्‍यांच्‍या निधनामुळे दूरदृष्टिकोन असलेला शिक्षणतज्‍ज्ञ हरपला, अशी भावना बुधवारी (ता. २४) मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केली. (Visionary Educationist Lost Tribute to Dr Ram Takwale nashik news)

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे संस्‍थापक कुलगुरू दिवंगत डॉ. राम ताकवले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्‍मारकात सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्‍ज्ञ तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे अध्यक्षस्‍थानी होते.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, माजी आमदार हेमंत टकले, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील आदी उपस्‍थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विलास शिंदे यांनी ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली वाहिली. रयत शिक्षण संस्‍थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे म्‍हणाले, की आमच्‍या संस्‍थेच्‍या सर्व शाळांमध्ये संगणक उपलब्‍धतेसंदर्भात डॉ. राम ताकवले यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले होते.

या निर्णयानंतर राज्‍यभरातील शाळांमध्ये संगणक कक्षाबाबत शासन व शैक्षणिक संस्‍थांनी आग्रह धरला. ॲड. ठाकरे यांनी डॉ. ताकवले यांच्‍या निधनाने आपण अलौकिक व्‍यक्‍तिमत्त्वाला मुकलो असल्याची भावना व्यक्त केली.

तीन विद्यापीठांचे कुलगुरूपद, ‘एमकेसीएल’च्‍या स्‍थापनेत योगदान, ‘नॅक’चे अध्यक्षपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्‍यांनी भरीव योगदान दिले. डॉ. ठाकरे म्‍हणाले, डॉ. ताकवले विलोभनीय व्यक्तिमत्त्व होते.

मॉस्‍को स्‍टेट युनिव्‍हर्सिटी (रशिया) येथून त्‍यांनी पीएच. डी. पूर्ण केली. त्‍यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळताना दूरदृष्टिकोनातून निर्णय घेतले, धोरणे ठरविली. घरोघरी ज्ञानगंगा पोचविण्यासाठी त्‍यांचा सदैव प्रयत्‍न राहिला. माजी संचालक डॉ. रमेश वरखेडे, कविता साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तंत्रज्ञानाचा सतत आग्रह

डॉ. ताकवले यांनी शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्‍या वापराचा आग्रह धरला. त्‍यांनी त्‍या काळी मांडलेल्‍या अनेक संकल्‍पना आज सत्‍यात उतरल्‍या आहेत. अगदी पुणे विद्यापीठात संगणकीकृत गुणपत्रिका असो किंवा सत्र पद्धतीतील शिक्षण, क्‍वेशन बँक आदी त्‍यांनी अवगत केलेल्‍या संकल्‍पना आजही शिक्षण क्षेत्रात प्रभावी मानल्या जातात. तंत्रज्ञानाच्‍या आग्रहाने त्‍यांनी शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला, असे कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठ उपकेंद्रातही श्रद्धांजली

नाशिक : ज्‍येष्ठ शिक्षणतज्‍ज्ञ डॉ. राम ताकवले यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडविले. त्‍यांनी दिलेले योगदान कायम स्‍मरणात राहील, अशी भावना मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातर्फे डॉ. ताकवले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी डॉ. ताकवले यांच्‍यासोबत विद्यापीठात प्रत्यक्ष कामादरम्‍यानचे अनुभव कथन केले. मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, डॉ. भदाणे यांनीही डॉ. ताकवलें‍सोबतच्‍या शैक्षणिक कार्याचे अनुभव विशद केले.

अधिसभा सदस्‍य डॉ. अपूर्व हिरे म्‍हणाले, की पारंपरिक शिक्षण व मुक्त विद्यापीठ अध्यापन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले. महाविद्यालय मानांकनासाठी महत्त्वाच्या ‘नॅक’चे अध्यक्षपद भूषविताना मूल्यांकन पद्धतीत योगदान दिले.

व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य सागर वैद्य यांच्‍यासह प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, प्राचार्य डॉ. संपत काळे, अशोक सावंत, डॉ. चिंतामण निगळे, ॲड. बस्ते आदी अधिसभा सदस्‍य उपस्‍थित होते. उपकेंद्राचे समन्‍वयक डॉ. प्रशांत टोपे यांनी प्रास्‍ताविक केले. व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. उमेश राऊत यांनी डॉ. राम ताकवले यांच्‍याविषयी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT