नाशिक

मतदारांचे मॅपिंग पूर्ण

CD
धुळे : टुडे ३ साठी....मेन -- लोगो छायाचित्र.....ईव्हीएम -- जिल्ह्यातील ८६ हजार मतदारांचे मॅपिंग पूर्ण -- ‘एसआयआर’ प्रक्रियेला गती : १६ नोव्हेंबरला जाहीर होणार अंतिम यादी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : राज्यासह जिल्ह्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच ‘एसआयआर’ प्रक्रिया गती आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील २००२ च्या मतदार यादीशी नाव न जुळल्यामुळे वगळण्यात आलेल्या एक लाख सहा हजार १४७ पैकी ८६ हजार ४१५ मतदारांचे मॅपिंग करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच, नावात किंवा तार्किक विसंगती असलेल्या एक लाख तीन हजार ७९ पैकी ९१ हजार ८४० मतदारांची विसंगती दावे-हरकती व सुनावणीच्या माध्यमातून दूर करण्यात आली आहेत. प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर दाखल झालेली सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून १६ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. - निवडणूक आयोगाच्या स्वयंचलित प्रणालीद्वारे पडताळणी करताना प्रामुख्याने दोन प्रकारच्या विसंगती समोर आल्या आहेत. नावात विसंगती अर्थात वर्तमान यादीतील स्पेलिंग व सरकारी कागदपत्रांमधील तफावत, विवाहित महिलांच्या आडनावातील बदल किंवा नातेवाईकांच्या नावात झालेला फरकामुळे नावे वगळली. तर तार्किक विसंगती अर्थात वयातील अस्वाभाविक अंतर, भावंडांच्या जन्मातील कमी अंतर यांसारख्या पॅटर्नमधील त्रुटी तपासल्या गेल्या. अशा प्रकारच्या विसंगती आढळलेल्या नागरिकांचे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यानी (बीएलओ) जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यांसारखी कागदपत्रे तपासून योग्य नावे कायम ठेवली आहेत. यासोबच ‘एसआयआर’ प्रक्रियेत २००२ च्या जुन्या मतदार यादीशी वर्तमान नोंदींची तुलना केली जाते. यात अनेकदा प्रत्यक्ष नाव न जुळणे, विवाहानंतर महिलांचे झालेले स्थलांतर किंवा नवीन मतदारांच्या बाबतीत त्यांच्या पालकांची जुनी नोंद उपलब्ध न असणे अशा बाबी समोर येतात. २००२ हे वर्ष आकडेवारीशी पडताळणी करण्यासाठी संदर्भ बिंदू मानले जाते. - १४-१ ...चौकट... १४-१ विसंतगी दूर करण्यात यश जिल्ह्यात २०२४ च्या अंतिम मतदार यादीत १८ लाख ३५ हजार १२५ मतदार नोंदणीकृत होते. या एसआयआर प्रक्रियेदरम्यान स्थलांतरित झालेले एक लाख ३५ हजार ८६२, मयत ५६ हजार ६९८, दुबार नावे असणारे ५४ हजार १३०, गैरहजर आढळलेले ४७ हजार १० आणि अन्य कारणांमुळे एक हजार १५७ अशा विविध कारणांमुळे एकूण दोन लाख ९४ हजार ८५७ मतदारांची नावे वगळण्यात आली होती. ही नावे वगळल्यानंतर जिल्ह्यातील प्रारूप यादीत १५ लाख ४०,२६८ मतदार शिल्लक राहिले होते. यातील आतापर्यंत एक लाख तीन हजार ७९ पैकी ९१ हजार ८४० मतदारांची विसंगती दूर करण्यात आली असून, ८६ हजार ४१५ मतदारांचे मॅपिंग यशस्वी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : महाराष्ट्र फोडायला दोन हजार कोटी कुठून आले? कर्जतच्या सभेतून राज ठाकरेंचा गंभीर आरोप

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT