election esakal
नाशिक

District Onion-Potato Union Election: कांदा-बटाटा संघासाठी 31 डिसेंबरला मतदान! पहिल्याच दिवशी 39 अर्जांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हाभर कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. १५ जागांसाठी ३१ डिसेंबरला मतदान होत आहे.

त्यासाठी बुधवार (ता. २२)पासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नसला तरी तब्बल ४० अर्जांची विक्री झाली आहे. (Voting for Onion Potato Union on December 31 39 applications sold on first day nashik)

जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक संघाची अंतिम मतदारयादी जाहीर झाली. यात सोसायटी गटातून २७७, तर वैयक्तिक सभासद गटातून एक हजार ३२७ मतदार आहेत. मतदार अंतिम झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी १५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्हा सहाय्यक निबंधक मनीषा खैरनार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. पहिला दिवस निरंक राहिला आहे.

पहिल्या दिवशी ४० अर्जांची विक्री झाली आहे. यात प्रामुख्याने विद्यमान संचालक राजाराम धनवटे, रमेशचंद्र घुगे, बापूसाहेब कुंदे, चंद्रकांत कोशिरे, संजय पवार, सीताराम अनवट, लक्ष्मीकांत (मुन्ना) कोकाटे यांचा समावेश आहे.

अर्ज दाखल करण्यास सुरवात झाल्यानंतर राजकीय हालचालींना देखील सुरवात झाली असून, पॅनल नेतृत्वाकडून भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

अर्ज दाखल झाल्यानंतर पॅनलनिर्मिती होण्याची शक्यता आहे. सदर निवडणूक बिनविरोध होत आलेली आहे; परंतु यंदा इच्छुकांची संख्या वाढली असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

...असा आहे निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल करणे २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान

प्राप्त अर्जाची छाननी ३० नोव्हेंबर

वैध अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध १ डिसेंबर

अर्ज माघारीसाठी कालावधी ४ ते १८ डिसेंबर

उमेदवारांना निशाणीचे वाटप १९ डिसेंबर

मतदान ३१ डिसेंबर

मतमोजणी तारीख ३१ डिसेंबर (मतदानप्रक्रिया झाल्यानंतर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: FIR न कळणारी लोकं पार्थ पवारांवर आरोप करताय - फडणवीस

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

Eknath Shinde : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ!

Ashish Shelar : ‘वंदे मातरम्’ हे विकसित भारताच्या दिशादर्शनाचे गीत’ आशिष शेलार; ‘ध्यास वंदे मातरम्‌चा’ पुस्तकाचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT