(पान ४ ला मेन)
CHM26B03607
वाडी शेवाडी : मध्यम प्रकल्पाचे संग्रहीत छायाचित्र.
बबलू कोळी : CHM26B03605
-------
‘वाडी- शेवाडी’च्या कालव्यांची कामे पूर्ण करा
शेतकऱ्यांचा इशारा; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण
सकाळ वृत्तसेवा
चिमठाणे, ता. ३१ : बुराई नदीवरील वाडी- शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्पाचे अनेक वर्षांपासून डाव्या व उजव्या कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी वाडी- शेवाडी धरण संरक्षण समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास रविवार (ता. १) पासून प्रकल्प स्थळी बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
वाडी- शेवाडी मध्यम प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, प्रकल्प डाव्या व उजव्या कालव्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना आवश्यक पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतीचे आर्थिक नुकसान होत असून, परिसरातील कृषी विकासावरही परिणाम होत असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे. दोन्ही कालव्यांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, पाणी वितरणाचे योग्य नियोजन करावे, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच, संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
कालव्यांच्या कामांची सद्यस्थिती, शिल्लक कामांचे नियोजन आणि कामे पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि शासनाच्या सिंचन योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणीही समितीने केली आहे.
----
शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने आता या प्रश्नावर ठोस निर्णय होणे आवश्यक आहे. प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
- बबलू कोळी, वाडी- शेवाडी धरण संरक्षण समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.