नाशिक

वाडीवऱ्हे व पाडळी जवळ दोन अपघातात आठ जखमी.

CD
VDH26B02659 वाडिवऱ्हे ः अपघातग्रस्त कार. २०-१ वाडिवऱ्हे परिसरात दोन अपघातात सात जखमी वाडीवऱ्हे, ता.१२ ः वाडिवऱ्हे परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकीस्वारांसह सात जण जखमी झाले. सांजेगाव रस्त्यावर गुरुवारी (ता.१२) सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. वाडिवऱ्हेकडे येणारी दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडली. चालकाच्या हातपाय व डोक्याला मार लागला. यात समीर दिनकर डगळे (१७), चैतन्य सीताराम पोटकुले (१९), गोटीराम रामदास बोराडे (२०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज आश्रमाच्या विनामूल्य रुग्णवाहिकेचे चालक निवृती पाटील गुंड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुसरा अपघात महामार्गावर पाडळी देशमुख येथे घडला. विठ्ठल कामत ढाब्याजवळ कार पलटी होऊन पाच जण जखमी झाले. गुरुवारी (ता.) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाडळीजवळ हा अपघात झाला. मुंबईहून नाशिककडे जाणारी कार ( एमएच४७, ए ६२८७) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून तिने दोन पलटी घेतल्या. या अपघातात संदीप बंडू कुंभारकर (३२), श्रीनाथ मानसिंग खवळे (३०), आकाश रामदास माळी (२९), अक्षय दशरथ साळुंखे (२८), शुभम वसंत वानखेडे (३०, रा. गंगापूर रोड, नाशिक) यांच्या डोक्यासह हातापायाला मार लागल्याने जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता सतेज पाटलांनी फेटाळली; "मला १०० टक्के खात्री आहे, विलीनीकरण होणार नाही"

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT