नाशिक

चक्करबर्डी परिसरातील नागरिकांचे पालक मंत्र्यांना निवेदन

CD
MSI26B09736 धुळे : पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देताना वडार समाजाचे प्रतिनिधी. ----------------- वडार समाजाची घरे जागेसह नियमाकूल करावीत चक्करबर्डी परिसरातील नागरिकांचे पालकमंत्र्यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. १३ : धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरातील वडार समाजाची वसाहत सरकारी गावठाणात बांधलेली सर्वच घरे ही जागेसह नियमानुकूल करत अधिकृत नावे करावीत, अशी मागणी पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली. निवेदनात चक्करबर्डी परिसरातील वसाहत ५१०- ‘अ’ व ५१०- ‘ब’मध्ये साधारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९२० च्या सुमारास वसलेली आहे.त्या वसाहतीचा आज मोठ्या वस्तीत रुपांतर होवून साधारण चार हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीचे शासन ध्येय धोरणे २०११ पूर्वी सरकारी गावठाणवर बांधलेली सर्वच घरे ही जागेसह नियमानुकूल होवून अधिकृत नावे होणे असतांना त्याबाबत लागणारे कागदपत्रे खासगी मोजणी शिट वगैरे सह प्रस्ताव महसूल विभाग, महानगर पालिका व भू- मापन कार्यासह समाजाचे प्रतिनिधी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, या कामास योग्य गती मिळत नसल्याने नियमानुकूल बाबतची कार्यवाही लवकरात लवकर होवून जागा मोजणीसह घरांची नोंदणी होवून आवश्यक आहे, असे नमूद केले आहे. पालकमंत्री श्री. रावल जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वडार समाजातील प्रतिनिधी व चक्करबर्डी परिसरातील नागरिकांनी भेट घेत निवेदन दिले. या वेळी वडार (ओड) समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव गुंजाळ, जिल्हाध्यक्ष दीपक वेताळ, उपाध्यक्ष चौगुले, चंद्रकांत लष्कर, सरचिटणीस अशोक कुसाळकर, खजिनदार अनिल कुसाळकर, विनोद तागडकर, राहुल वेताळ, शरद कुसाळकर, अंबादास लष्कर, सोमनाथ माने, ईश्‍वर वेताळ, तुषार कुसाळकर, नारायण लष्कर, सागर कुसाळकर, शाम कुसाळकर, महादू कुसाळकर, भगवान कुसाळकर, विलास कुसाळकर, अनिल तागडकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT