Wage hike for Mahindra workers esakal
नाशिक

‘महिंद्र’च्या कामगारांमध्ये आनंदोत्सव; सर्वांना भरघोस वेतनवाढ

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : महिंद्र अँड महिंद्र अतंर्गत कामगार सघंटनेची वेतनवाढ कराराची सभा दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा झाली. नवीन वेतनवाढ करारानुसार महिंद्र कंपनीतील कामगांराना यापुढे वेतन मिळणार आहे. याशिवाय महिंद्र वेल्फेअर मध्ये कामगारांच्या पत्नीचा समावेश केल्यामुळे प्रत्येक कामगाराच्या पत्नीचा सर्व प्रकारच्या आजारपणाचा संपूर्ण अमर्यादित खर्च महिंद्र वेल्फेअर व कंपनी व्यवस्थापन करारानुसार करणार आहे.

कामगारांच्या कुटुंबीयांनाही मिळणार अनेक सुविधा

नवीन वेतनवाढीच्या कराराची मुद्दत सहया केल्यापासून पुढे साडेतीन वर्षे राहिल. वेतनवाढीच्या चार महिने फरकाची रक्कम ४१ टक्के कामगारांना मिळणार आहे. कराराचा लाभ दोन हजार सत्याऐंशी कामगारांना मिळणार आहे. तर नवीन करारानुसार सव्वा आठ टक्के उत्पादन वाढ देण्याचे दोघांनी मान्य केले आहे. सभेच्या प्रारंभी महिंद्र परीवारातील निधन झालेल्या कामगारांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व कोरोना काळात महिंद्र परीवारातील सदस्यांना आरोग्य विषयक मदत करणारे महिंद्र वेल्फेअरचे "कोरोना योध्दा" पोपटराव देवरे, मोहन मगर, प्रसाद शुक्ल, दीपक उतेकर, सदानंद आमले, यांचा कामगार सघंटनेने सत्कार केला, यावेळी पोपटराव देवरे यांनी मनोगत व्यक्त केले .

महिंद्र कामगार सघंटना निवडणून १३ फ्रेब्रुवारी २०२१ रोजी झाली. निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी निवडून आले होते. कामगार सघंटनेने फक्त दहा दिवासातच वेतनवाढ करार मागणी पत्र तयार केले. व १७ मार्च २०२१ रोजी कराराचे मागणीपत्र महिंद्र कंपनी व्यवस्थापनाला सादर केले. करारा संर्दभात व्यवस्थापन व कामगार संघटनेची पहिली मिटींग कोरोना काळात व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे १४ मे २०२१ रोजी झाली, तर दोन महिन्यात तब्बल चाळीस मिटिंग झाल्या. करारानुसार सव्वा आठ टक्के उत्पादन वाढ व १४३५१ रुपये ते १७३९२ रुपये कामगारांना वेतनवाढ देण्याचे दोघांनी मान्य केले. कराराच्या कच्चा मसुदयावर २२ ऑक्टोबर २०२१ रोजी कामगार सघंटना पदाधिकारी व कंपनी व्यवस्थापन प्रतिनीधींनी स्वाक्षरी केली.

अशी मिळेल वेतनवाढ

नवीन कामगारास ३६४५३, पंचवीस वर्षे सेवा झालेल्या कामगारास ७६४१३ व जेष्ठ कामगारास ८३७५४ ऐवढे वेतन दरमहा यापुढे मिळणार आहे. नवीन वेतवाढ करारानुसार कायम कामगारांच्या पत्नीचा आजारपणाचा अमर्यादित सर्व प्रकारचा खर्च महिंद्र वेल्फेअर व कंपनी व्यवस्थापन करणार आहे. तर वेल्फेअर फंडातून मृत कामगारांच्या वारसांना सात लाख रुपये मदत निधी दिला जाईल. कंपनीच्या नियमानुसार मृत कामगाराचा मुलगा कंपनीत नोकरीस लागल्यास त्या वारसास पाच लाख रुपये मदत जाईल. महिंद्र कंपनी व्यवस्थापन महिंद्र वेल्फेअर फंडास आता दरवर्षी पस्तीस हजार रुपये अनुदान ऐवजी सात लाख रुपये अनुदान देणार आहे. मृत कामगार व कामगार यांच्या मुलांनी नोकरीत सामावून घ्यावे याबाबत कामगार सघंटना व कंपनी व्यवस्थापन यांच्या मिटींगा सुरुच आहेत.

नवीन करारानुसार 1 नोंव्हेबरला कंपनीत उत्पादनवाढ देण्याचे काम सुरु होणार आहे. वेतनवाढीच्या नवीन पक्या कराराच्या मसुदयावर दोन नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता कंपनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत धांडे यांच्या दालनात कामगार सघंटना प्रतीनिधी व कंपनी व्यवस्थापन प्रतीनिधी स्वाक्षरी करणार आहेत .

बडतर्फ कामगार नेत्यांना कामगांराकडून 30 लाखाची मद्दत.

सातपूर महिंद्र अँड महिंद्र कामगार सघंटना माजी सरचिटणीस व बडतर्फ कामगार प्रवीण शिंदे व उपाध्यक्ष अमोल सोनवणे हे युनीयन पदावर आसतांना त्यांना कंपनी व्यवस्थापनाने विविध कारणामुळे नोकरीतून बडतर्फ केले होते. कामगार सघंटनेच्या सभेत या कामगारांना नवीन वेतनवाढीच्या कराराच्या थकबाकी रक्कमेतून प्रत्येक कामगाराने दिड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. अशी सर्व कामगारांची एकुण रक्कम तीस लाख रुपये जमा होईल. त्या रक्कमेतून प्रवीण शिंदे यांना पंधरा लाख व अमोल सोनवणे यांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये देण्यात येणार आहे.

यापुढे ही कामगार सघंटना व विभाग प्रतीनिधींसाठी अशी कायम मदत केली जाईल अशी सुचना अशोक पाटील यांनी मांडली व राजेंद्र बोरसे यांनी अनुमोदन दिले व सर्व कामगारांनी या ठरावास अवाजवी व हात उंच करुन ठराव पास करण्यास मंजूरी दिली.

सभेच्या अध्यक्षस्थानी कामगार सघंटनेचे अध्यक्ष एन डी जाधव होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सजंय घुगे, सरचिटणीस सजंय घोडके,सहचिटणीस अजीत थेटे, चिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, खजीनदार सचीन मोरे, कमीटी मेंबर प्रकाश धनगरमाळी, संतोष सावकार होते. सभेचे प्रस्तावीक उपाध्यक्ष सजंय घुगे व संतोष सावकार यांनी केले व कराराचे वाचन अजीत थेटे, जितेंद्र सुर्यवंशी, संजंय घुगे, आदीने वाचन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

ChatGPT सांगणार कपडे तुमच्यावर कसे दिसतील? खरेदीआधीच पाहा लूक; असे वापरा 'Virtual Try-On' हे भन्नाट फिचर...

Latest Marathi News Live Update : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसंदर्भातील महाविकास आघाडीची बैठक संपली

SCROLL FOR NEXT