नाशिक

वाघनगरच्या जलवाहिनी गळतीची ग्रामपंचायतीकडून दखल

CD
ॲंकर NSK26H31883 जळगाव : वाघनगर येथील पाणी गळती होणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉलची दुरुस्ती करताना सावखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य. लोगो : सकाळ इम्पॅक्ट ........ वाघनगरच्या जलवाहिनी गळतीची ग्रामपंचायतीकडून दखल २९ व्हॉल्वची तपासणी व दुरुस्ती; पाण्याची नासाडी रोखण्यासाठी उपाययोजना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : वाघनगर परिसरात वाघूर धरणावरून येणाऱ्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याच्या वृत्ताची सावखेडा ग्रामपंचायतीने दखल घेतली आहे. धरणापासून वाघनगरपर्यंतच्या जलवाहिनीवरील २९ व्हॉलची तपासणी आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या तपासणीत ज्या व्हॉलमधून पाण्याची गळती होत होती, त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. वाघनगर आणि कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला होता. अमृत योजनेअंतर्गत सुमारे पाच वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीवरील २९ एअर व्हॉल्वपैकी आठ व्हॉलमधून गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर सावखेडा ग्रामपंचायतीने जलवाहिनीवरील व्हॉलची तपासणी करून दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यानुसार २९ व्हॉल्वची पाहणी करण्यात आली. गळती आढळलेल्या व्हॉल्वची दुरुस्ती करण्यात आल्याने पाण्याची नासाडी रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. चौकट नियमित पाणीपुरवठ्याचे आव्हान कायम वाघनगर आणि कोल्हे हिल्स परिसरातील सुमारे आठ ते दहा हजार घरांना आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते. त्यामुळे जलवाहिनीची गळती रोखण्यासोबतच नियमित पाणीपुरवठा होणेही आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या दुरुस्तीमुळे पाण्याची नासाडी कमी होण्याची अपेक्षा असून, संबंधित यंत्रणेने जलवाहिनीची नियमित देखभाल करून नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. कोट वाघूर धरणापासून असलेल्या जलवाहिनीचे जेथे व्हॉल्व गळती होती ते व्हॉल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत सावखेडा ग्रामपंचायत यापुढे दक्षता घेतली जाणार आहे. तसेच या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा ज्या भागात होतो तेथे व्यवस्थित पाणीपुरवठा होतो की नाही व पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल. - संतोष पाटील, माजी सरपंच, सावखेडा ग्रामपंचायत, तथा नगरसेवक. जळगाव मनपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्यास कोगनोळी टोल नाक्यावर बेमुदत बंद, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Marathi News Live Updates : तब्बल ८ तासांनंतर तुषार गांधी यांची सुटका

Microfinance : मायक्रोफायनान्स क्षेत्रात सुधारणा; कर्जपुरवठ्यात शिस्त आणि तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका

Amazon Great Indian Festival : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्ट; दीड लाख हंगामी नोकर भरती

WEALTHY ZODIAC SIGNS: जन्मापासूनच श्रीमंतीचं नशीब घेऊन येतात ‘या’ ४ राशींचे लोक; पैशांच्या बाबतीत असतात लकी

SCROLL FOR NEXT