नाशिक

वाघूरचे पाणी अन्यत्र वळवू नका

CD
NSK26H31768 जळगाव : आयुक्त आदित्य जिवने यांना वाघूर वाहिनीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व क्रीडा संकुलाला पाणीपुरवठा न करण्याबाबत निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, संग्रामसिंह सूर्यवंशी, राजू मोरे, मंगला पाटील, मजहर पठाण, सुनील माळी आदी. ........... वाघूरचे पाणी अन्यत्र वळवू नका राष्ट्रवादी (श. प.) पक्षाचे आयुक्तांना निवेदन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : शहराला सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता वाघूर धरणातील पाणी अन्य प्रकल्पांकडे वळवू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व क्रीडा संकुलासह अन्य प्रकल्पांसाठी वाघूरचे पाणी देण्यास पक्षाने विरोध दर्शविला असून, यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिकेच्या ९ ऑक्टोबरच्या महासभेत वाघूर धरणातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अन्य ठिकाणी पाइपलाइनद्वारे पाणी वळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहराच्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सांगितले. आयुक्त जिवने यांनी निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी संग्रामसिंह सूर्यवंशी, राजू मोरे, मंगला पाटील, मजहर पठाण, सुनील माळी, किरण राजपूत, गणेश पाटील, विनायक पाटील, नईम खाटिक, नामदेव वाघ, गणेश हटकर व सतीश चव्हाण उपस्थित होते. चोवीस तास पाणीपुरवठ्याचे काय शहराची हद्द आणि लोकसंख्या वाढत असताना भविष्यातील गरजेसाठी वाघूरचे पाणी पुरेसे राखीव ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यातून अन्य प्रकल्पांना पाणी देणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका पक्षाने मांडली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था कशी करण्यात आली, तसेच बांधकामावेळी आवश्यक क्युरिंग प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली का, याची तपासणी करण्यासाठी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणीही लाडवंजारी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT