नाशिक

वाघुर धरण प्रकल्पाच्या पाणीवापर फेरनियोजनाला मंजुरी

CD
‘वाघूर’च्या पाणीवापर फेरनियोजनाला शासनाची मंजुरी --- कुऱ्हे पानाचे, शेंदुर्णीला फायदा; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १४ : जिल्ह्यातील वाघूर पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच मंत्रालय स्तरावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका झाल्या होत्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत या विषयावर वारंवार चर्चा झाली होती. या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने बुधवारी (ता. १४) शासन निर्णय जारी करून वाघूर प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेरनियोजनास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कुऱ्हा पानाचे उपसा सिंचनासाठी ११.३३, तर शेंदुर्णीच्या पाणीपुरवठ्यासाठी २.४७ दशलक्ष घनमीटर पाण्याची तरतूद झाली आहे. वाघूर प्रकल्पाच्या मंजूर सातव्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार एकूण वार्षिक पाणीवापर ३६३ दशलक्ष घनमीटर आहे. नव्या फेरनियोजनानुसार सिंचनाचा एकूण पाणीवापर २१५.७० वरून २२७.०३० दशलक्ष घनमीटर केला आहे. यात कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ साठी ११.३३० दशलक्ष घनमीटर पाण्याची नव्याने तरतूद केली आहे. बदल करण्याचे निर्देश या मंजुरीसोबतच एकात्मिक जलआराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन आणि शेंदुर्णी पाणीपुरवठा योजनेच्या पाणीवाटपाला सुधारित नियोजनात अधिकृत स्थान मिळाले आहे. पाणीवापर ३६३ दशलक्ष घनमीटरच शासन निर्णयातील परिशिष्टानुसार, वाघूर प्रकल्पाचा एकूण वार्षिक पाणीवापर ३६३ दशलक्ष घनमीटर कायम ठेवला आहे. नव्या नियोजनात सिंचनासाठी २२७.०३० दशलक्ष घनमीटर पिण्याच्या पाण्यासाठी ६३.२६०, औद्योगिक वापरासाठी ९.७८० आणि बाष्पीभवनासाठी ६२.९३० दशलक्ष घनमीटर पाण्याची तरतूद आहे. भविष्यातील गरजांसाठी राखीव असलेले १३.८०० दशलक्ष घनमीटर पाणी या फेरनियोजनात पूर्णपणे समायोजित केले आहे. --- कोट वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याने झालेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे समजते.‌ लवकरात लवकर ई-टेंडरिंग काढून निविदा प्रसिद्ध करून शेती सिंचनासाठी योजनेच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. शेताच्या बांधावर पाणी येणार नाही, तोपर्यंत पाणी हक्क समिती आपली आंदोलनाची दिशा ठरवत राहील. -सुधाकर बडगुजर, कार्यकर्ते, शेतकरी पाणी हक्क समिती, कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT