पान-३ मेन
वेध प्रभागाचा
---------------
प्रभाग क्र. ११
(कमलनगर, ढोकेनगर, सरस्वतीनगर, जय मल्हार कॉलनी, वाजे लॉन्स परिसर)
सरदवाडी मार्गावरील भाजी बाजारामुळे वाहतूक कोंडी कायम
अनियमित पाणीपुरवठा; प्रभागातील बहुतांश भागात रस्त्यांची समस्या
संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ६ ः वंजारी समाज मैदानापासून ते झापवाडी शाळा आणि ढोकेनगरपासून ते मॉडर्न कॉलनीपर्यंतचा परिसर प्रभाग ११ मध्ये येतो. या प्रभागात सर्वांत मोठी समस्या सरदवाडी मार्गावर भरणाऱ्या भाजी बाजाराने होणाऱ्या वाहतूक कोंडीची आहे. थेट रस्त्यात बाजार भरत असल्याने उपनगरांतील नागरिकच नव्हे, तर आणखी तीन गावांतील ग्रामस्थांना या बाजाराने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
......................
प्रभागातील बहुतांश कॉलनी रस्ते अजून होणे बाकी आहे. गणेश मंदिर ते देवी मंदिरापर्यंतचा मार्ग अजूनही काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. नागरिकांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे अवेळी पाणीपुरवठा कधी चार दिवसाने, तर कधी सहा दिवसाने पाणीपुरवठा होतो. त्यातही पाण्याची येण्याची वेळ निश्चित नाही. प्रभागात औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग वास्तव्यास आहे. अवेळी होणारा पाणीपुरवठा आणि अवेळी येणाऱ्या घंडागाडीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी
सरदवाडी मार्गावरील वाजे लॉन्सजवळ पावसाळ्यात पाणी साचून राहत होते. त्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत होती. मात्र आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याने या त्रासातून काही प्रमाणात नागरिकांची सुटका झाली आहे. नगरसेवकांनी खुल्या भूखंडांची स्वच्छता केल्याने आरोग्याच्या दृष्टीने ही बाबही महत्त्वाची ठरली आहे.
.............
चौकट
प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव
- ॲम्फी थिएटरचा प्रस्ताव
- महिलांसाठी पिंक टॉयलेट
- आर्ट गॅलरी आणि स्मार्ट अंगणवाडी
- हिंदुहृदयसम्राट हॉस्पिटल
- जॉगिंग ट्रॅकची उभारणी
--------------
नगरसेवक काय म्हणतात...
ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. लवकरच त्याची अनुभूती नागरिकांना येणार आहे.
- शुभम वारुंगसे
-----------
नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच वेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. प्रभागातील कामकाज आदर्शवत करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत.
- कमळाबाई पगार
----------------
नागरिक काय बोलतात...
उपनगरात चांगल्या बगीचाची गरज आहे. खुल्या भूखंडाचा वापर करून त्याचा विकास करावा. ग्रीन जिमचीही आवश्यकता आहे. ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकांची सुविधा हवी.
- सचिन बोरसे, महादेव कॉलनी
-----------
रस्त्यावरील पथदीपांची व्यवस्था चांगली आहे. स्वच्छताही होते. तथापि, वृक्ष लागवड, जॉगिंग ट्रँकची गरज आहे. वृद्धांसाठी बाक, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची गरज आहे.
- प्रा. प्रभाकर चतुर, सरस्वतीनगर
(उद्याच्या अंकात - प्रभाग क्र. १२ – भगत मळा, वंजारगल्ली, बसस्थानक परिसर, रामनगरी, सिद्धिविनायक मंदिर परिसर)
.............
फोटो क्र. 23423
१) ढोकेनगराकडे जाणाऱ्या रस्त्याचे झालेले काँक्रिटीकरण.
फोटो- 23425
२) दत्त मंदिराजवळील रस्त्याची झालेली दुरवस्था.
फोटो- 23427
३) शुभम वारुंगसे
फोटो- 23429
४) कमळाबाई पगार
फोटो-23431
५) प्रा. प्रभाकर चतुर
फोटो-23433
६) सचिन बोरसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.