Election esakal
नाशिक

मनमाड नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर; राजकीय घडामोडींना येणार वेग

मनमाड नगरपरीषदेच्या प्रभाग रचनांचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपरीषद प्रशासनाने जाहीर केला.

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मनमाड नगर परिषदेतील सूचना फलकावर आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी द्विसदस्य प्रभाग पद्धतीनुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉ. सचिनकुमार पटेल यांनी सांगितले.

यापूर्वी मनमाड नगरपरीषदेच्या प्रभाग रचनांचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपरीषद प्रशासनाने जाहीर केला. त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. मनमाड शहरातून या प्रारूप प्रभाग रचनेवर आणि आराखड्यावर १८ हरकती आणि सूचना दाखल झाल्या होत्या. मुदतीनंतर जिल्हा प्रशासनाने या हरकती आणि सूचनाची पाहणी करून तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. या अगोदर जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार मनमाड नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. आगामी मनमाड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी द्विसदस्य प्रभाग पध्दतीनुसार मनमाड नगर परीषदची नव्याने प्रभाग रचना गुरूवारी पालिका प्रशासनाने जाहीर केली. या नव्या प्रभाग रचनेनुसार मनमाड शहरात १५ दोन सदस्यीय प्रभाग, १ तीन सदस्यीय प्रभाग असे एकूण १६ प्रभाग आणि ३३ वॉर्ड अशी नवी प्रभाग रचना पालिकेच्या सभागृहात सूचना फलकावर लावण्यात आली. २०११ च्या जणगणननेनुसार ही अंतिम प्रभाग रचना करण्यात आली आहे. नगरपरीषदेच्या फलकावरील हि अंतिम प्रभाग रचना पाहण्यासाठी परीषद कार्यालयात इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT