नाशिक

घात - अपघात

CD
वऱ्हाणेत वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू मालेगाव : वऱ्हाणे शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर जितो वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अनिल भास्कर कदम (वय ३५, रा. मांजरे) असे मृताचे नाव आहे. कदम हे सीडी डिलक्स दुचाकीने (एमएच ४१ एल ६५३) मालेगाव-मनमाड रस्त्याने मांजरे येथे घरी जात होते. २ ऑक्टोबरला रात्री साडेआठला पेट्रोल पंपासमोर दूध घेऊन जाणाऱ्या जितो वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या डोक्याला, पायाला, चेहऱ्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुनील भास्कर कदम (वय ३८, रा. मांजरे) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात जितोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. चालकाचे नाव व गाव समजू शकले नाही. दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी मालेगाव : हिंगलाजनगरातील रस्त्यावर दुचाकीने पादचाऱ्यास पाठीमागून धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. विजय रमेश शिंदे हे हिंगलाजनगरातील गल्लीतून कामावर जात होते. त्यावेळी होंडा युनिकॉर्न दुचाकीने (एमएच ४१ बीवाय २९६३) त्यांना धडक दिली. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत भारत रमेश शिंदे (वय ३६, रा. चंद्रमनीनगर) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीस्वाराचे नाव व गाव समजू शकले नाही. जुन्या वादातून एकास मारहाण मालेगाव : जाफरनगरातील पाटकिनारा रस्त्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना घडली. साजीद अहमद बरकत उल्ला (वय ४३) असे जखमीचे नाव आहे. सैफ सामिकचा लहान भाऊ व सईद अहमद जहीर अहमद (दोघे रा. जाफरनगर) यांनी साजीद यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. साजीद समजावून सांगत असताना सैफ सामिकच्या लहान भावाने धारदार हत्याराने त्यांच्या उजव्या मांडीवर वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. सईद अहमद याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भांडणात साजीद यांचा मोबाईल व खिशातील पैसे गहाळ झाले. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना धक्का; उमेदवारी अर्ज अवैध, शक्तिप्रदर्शन करत दाखल केला होता अर्ज

Raju Shetti Protest : राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक बंद, हजारो शेतकरी दाखल

दिल्लीत सहकाऱ्यांना पुन्हा ताब्यात घेतलं, दीपके कच्च्या रस्त्याने पोहोचले शेतात; आंदोलनाबाबत फोनवरून चर्चा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौरांच्या पतीची चौकशी सुरू

Manoj Jarange: “जरांगेनीच माझ्यावर हल्ल्यासाठी सुपारी दिली”; अमोल खुणेंचा गंभीर आरोप, म्हणाले, “आता सुट्टी देणार नाही”

SCROLL FOR NEXT