hunger strike  esakal
नाशिक

औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा

निलेश छाजेड

नाशिकरोड : नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचा गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढ फरक व 20℅ पगारवाढ दिलेली नाही तर काहींनी कामगारांच्या पगार वाढीचा फरक त्यांच्या खात्यात जमा करून पुन्हा त्यांच्याकडून चुकून जमा झाला असे सांगून परत ती रक्कम काढून घेतली. त्यामुळे येत्या सणासुदीला कंत्राटी कामगार संघटना बेमुदत संपाच्या तयारीत आहे.

नुकतीच वंचित बहुजन आघाडी प्रणित कंत्राटी कामगार संघटना व रिपब्लिकन फेडरेशन पदाधिकाऱ्यांची, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व व्यवस्थापन यांची बैठक झाली परंतु चर्चेत असोसिएशनच्या वतीने आम्हाला जानेवारी 2020 पासूनचे पगार वाढीचा फरक एकलहरे येथील प्रशासनाने दिले नसल्याचे सांगितले. परंतु वस्तुस्थिती याऊलट असल्याचे कंत्राटी संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेचे सर्व सभासद बैठकीदरम्यान प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी उपस्थित होते. बैठकीला दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

एकलहरे येथील व्यवस्थापनाने कंत्राटदारांना वेतन वाढीचा फरक टेंडरमध्ये अटी घातलेल्या असतांनाही संबंधित कंत्राटदार कामगारांना फरकाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. या विषयावर संबंधित कंत्राटी संघटनेने व्यवस्थापन, मुख्यालय पातळीवर तसेच कामगार आयुक्त यानांही पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापही न्याय मिळाला नसल्याचे पदाधिकारी सांगतात.

''गेल्या दहा ते वीस वर्षांपासून कंत्राटदारांना पगार वाढ फरकाचे बिले मिळाले असून कंत्राटदारांची कामगारांना देण्याची नैतिकता नाही, तसेच यांत येथील व्यवस्थापन कंत्राटदारांची बाजू घेत असल्याचे दिसून येते, हे यावरून लक्षात येते. यासाठी आम्ही माहिती अधिकाराचा वापर करून न्याय मिळवू तसेच कामगार न्यायालयात आव्हान उभे करू.'' - मुकेश बोरसे, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, एकलहरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT