paneer wash video 1.png
paneer wash video 1.png 
नाशिक

किळसवाणा प्रकार! डीश धुण्याच्या वॉश बेसिनमध्येच धुतले पनीर; स्वीट मार्टचा व्हिडिओ व्हायरल

राजेंद्र अंकार

सिन्नर (जि.नाशिक) : नाशिक-पुणे महामार्गावरील बसस्थानक परिसरातील एका झगमगीत बोर्ड लावलेल्या स्वीट मार्टमध्ये डीश धुण्याच्या वॉश बेसिनमध्येच ग्राहकांना खाण्याच्या पदार्थांत टाकण्यात येणारे पनीर धुतले जात असल्याचा प्रकार मोबाईलद्वारे व्हायरल झाला. 

स्वीट मार्टचा धक्कादायक प्रकार मोबाईलमध्ये व्हायरल

गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिसरातील या स्वीट मार्टचा कामगार खाली पडलेले पनीर शेवाळलेल्या बेसिनमध्ये स्वच्छ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये त्या स्वीट मार्टचे नाव स्पष्ट दिसत असल्याने तो शहरातील बसस्थानक परिसरातील असल्याचे आढळले. नाशिक-पुणे महामार्गावरील बसस्थानक परिसरातील एका झगमगीत बोर्ड लावलेल्या स्वीट मार्टमध्ये डीश धुण्याच्या वॉश बेसिनमध्येच ग्राहकांना खाण्याच्या पदार्थांत टाकण्यात येणारे पनीर धुतले जात असल्याचा प्रकार मोबाईलद्वारे व्हायरल झाला आणि दुकानदाराला परिसरातील नागरिकांनी चोप दिला. 

कामगारांसह मालकाला चोप 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच स्थानिक नागरिकांनी सोमवारी (ता. १९) संबंधित स्वीट मार्टच्या चालकाला चोप देत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत तंबी दिली. खात्री पटल्यानंतर सोमवारी (ता. १९) दुपारी तीनच्या सुमारास मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य असा सगळा प्रकार तसाच दिसत होता. किचन पाहणी केली असता, जिथे पदार्थ बनतात त्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी कामगारांना चोप दिला, तसेच काही काळ दुकान बंद करण्यास भाग पाडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT