नाशिक

गस्तीदरम्यान शिटी वाजविल्याच्या कारणावरून वॉचमनवर चाकूने वार

CD
गस्तीवर शिटी वाजविल्याने सुरक्षारक्षकावर चाकूने वार चार जणांचा हल्ला; जखमीला गटारीत फेकले सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : परिसरात गस्त घालताना शिटी वाजविल्याच्या कारणावरून सुरक्षारक्षक (वॉचमन) फुलसिंग पवार यांच्यावर चार जणांनी वाद घालत चाकूने वार केला. त्यानंतर त्यांना गटारीत फेकून दिले. ही घटना शुक्रवारी (ता. ९) पहाटे प्रभूदेसाई कॉलनीत घडली. जखमी पवार यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभूदेसाई कॉलनी परिसरात फुलसिंग पवार हे पहाटेच्या वेळी गस्त घालत होते. त्या वेळी ते शिटी वाजवत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांना अडवून, ‘आम्हाला पाहून शिटी का वाजवितो?’ अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यातील एकाने पवार यांच्या मांडीवर चाकूने वार केला. हल्ल्यानंतर त्यांना गटारीत फेकून देत संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेले जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल वाघ, पोलिस कर्मचारी कमलाकर बडगुजर, प्रवीण जाधव आणि चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी पवार यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Election 2027: पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड! सहा वर्षांनंतर भाजपचा जुना मित्र पुन्हा सोबतीला; शाहांनी सांगितला मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला

Shubman Gill: शुभमन गिलच्या मागणीला ICC कडून प्रतिसाद नाही! चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी कायम राहणार, कारणही आलं समोर

काळाचौकी पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी विकसकाला दणका! न्यायालयाकडून इरादा पत्र रद्द करण्याचा निर्णय कायम

Latest Marathi News Update: 15 हजारांची लाच घेताना दोन कर्मचारी रंगेहाथ पकडले

Who is Harpreet Singh? भारताकडून वर्ल्ड कप खेळला अन् आज आपल्याचविरुद्ध ठोकले शतक; पठ्ठ्याने यूएईला सावरले, तिलक वर्माचे टेंशन वाढवले

SCROLL FOR NEXT