नाशिक

कापडणे जलतारा शोषखड्डा

CD
राम भदाणे : KPD26B13532 ---------- जलतारासह शोषखड्ड्यास गती द्या : आमदार भदाणे कापडणे, ता. १९ : धुळे तालुक्यात विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानातून (ग्रामीण) धुळे ग्रामीणमध्ये जलसंधारणाची चळवळ अधिक गतीमान करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शेतकरी व नागरीकांनी शेतात जलतारा खड्डा आणि घराशेजारी शोषखड्डा करावा, पाणी संवर्धनास गती देण्याचे आवाहन आमदार राम भदाणे यांनी केले आहे. आमदार भदाणे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असताना केवळ सरकारी योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक शेतकरी आणि कुटुंबाने पुढाकार घेतला पाहिजे. शेतात जलतारा खड्डा मारल्याने अनेक फायदे होतात. शेतातील पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरते. भूजल पातळी वाढते. रब्बी हंगामात शेत पिकांना ओलावा उपलब्ध होतो. मातीची धूप कमी होते. शाश्वत शेतीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. कमी खर्चात आणि मनरेगा अंतर्गत मजुरीतून हा खड्डा शेतात तयार करता येतो. त्याचप्रमाणे घरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होणेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी घराशेजारी शोषखड्डा हा उत्तम उपाय आहे. घरातील वापरलेले पाणी जमिनीत मुरल्याने परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतो. साचलेल्या पाण्यामुळे होणारी डासांची पैदास कमी होते. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना आळा बसतो. भूजल पातळी सुधारते आणि पर्यावरण संवर्धनास मदत होते. आमदार भदाणे म्हणाले, धुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कामांची नोंदणी सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे निधन

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT