नाशिक

अभियंत्यांनी मुख्यालयी राहुन शेतकर्यांच्या बांधावर जावे

CD
फोटो : 31214 नाशिक : जलसेवा संकल्प अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, सुबोध मोरे, वैभव भागवत, सोनल शहाणे आदी ... शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा; पाण्याचे प्रश्न जागेवर सोडवा ‘जलसेवा संकल्प अभियाना’त मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांच्या अधिकाऱ्यांना सूचना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन व संवर्धन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबून न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, अशा सूचना जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी दिल्या. जलसंपदा विभागातर्फे २ ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘जलसेवा संकल्प अभियाना’चे उद्घाटन शुक्रवारी सिंचन भवन परिसरात झाले. यावेळी गिते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आपण पानदेव आहोत, या भावनेतून काम केले तरच बळीराजाला खरा न्याय देता येईल. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसण्याऐवजी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. त्यामुळे पाणीवाटपासह अनेक प्रश्न जागेवरच सोडविण्यास मदत होईल. यावेळी गोदावरी, दारणा, कादवा, कश्यपी, नेत्रावती व गौतमी नद्यांच्या कलशातील पाण्याचे पूजन करण्यात आले. पालखेड विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुबोध मोरे यांनी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व जलसंधारण या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज व्यक्त केली. कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे व सोनल शहाणे यांनी अभियानाचे महत्त्व सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी पाणीपट्टी आकारणी व वसुली, अनधिकृत पाणी उपशाला आळा आणि जलसंवर्धनासाठी सर्वांनी योगदान देण्याचे निर्देश दिले. विकास अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित रौदळ यांनी आभार मानले. यावेळी उपअभियंता प्रवीण पवार, नीलेश वन्नेरे, शाखाधिकारी वैभव कळमकर, हर्षल बागुल, प्रसाद डांगळे, गौरव गोसावी, पाटील, श्रद्धा खोत, सुजाता दुसाने, शीतल सूर्यवंशी, प्रज्ञा जाधव, गणेश हारदे व अनिल सूर्यवंशी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT