नाशिक

जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये जलपुर्नभरणासाठी प्रयत्न

CD
जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये होणार ‘जलफेरभरण’ --- ‘भूजल सर्वेक्षण’ला हवे ३१ कोटी; जिल्हा नियोजनला प्रस्ताव सादर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर भूजल सर्व्हेक्षण विभागाने जलसंधारण, तसेच जलफेरभरण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी ३१ कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे दिला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर सदर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. चालू वर्षी पावसाने खंंड दिल्याने जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने संबंधित तालुक्यांत दुष्काळाच्या १२ प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या. तसेच, स्थानिक पातळीवर दुष्काळाच्या मुकाबल्यासाठी विविध शासकीय यंत्रणांना पुढे येत उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. या उपाययोजनांसाठी आवश्‍यक निधीकरिता जिल्हा नियोजन समितीची तिजोरी खुली करून देण्यात आली. जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्हा नियोजनमधून आतापर्यंत तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानंतर भूजल सर्व्हेक्षण विभागाने आता पुढे येत जलसंधारण व जलफेरभरणासाठी विविध कामे हाती घेण्याची तयारी केली. त्यासाठी पंधराही तालुक्यांतील दुष्काळाशी सर्वाधिक परिणाम जाणवणाऱ्या २२८ गावांची निवड विभागाने केली आहे. या गावांमध्ये विहीर फेरभरण, आडवा बोअर घेणे, जमिनीत फेरभरणासह पाणीपातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने राबवायच्या उपाययोजनांसह निरनिराळ्या कामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या कामांसाठी ३१ कोटींचा निधी आवश्‍यक असून, तसा प्रस्ताव विभागाने जिल्हा नियोजन समितीपुढे सादर केला. सदरच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यावर संबंधित गावांमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे दुष्काळाच्या तीव्रता कमी करण्यास मदत मिळू शकणार आहे. पाच टक्क्यांची अट शिथिल राज्य सरकारच्या ५ ऑक्टोबरच्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समितीमधील पाच टक्के निधी हा दुष्काळी उपाययोजनांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक होते. मात्र, दुष्काळाची तीव्रता, तसेच प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता सरकारने पाच टक्के निधी राखीवची अट शिथील केली आहे. त्यामुळे येत्या काळात दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देणे शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल खून खटल्याची सुनावणी चार डिसेंबरला

महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम बदलले! आता १२ वर्षांखालील मुलांना एकट्यानं प्रवेश बंद; सोसायट्यांची जबाबदारी वाढली

Paradh News : मोबाईल उघडल्या नंतरच महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या आत्महत्याचे कोढे उलगडणार.....? चार दिवसानंतर ही महाराजांच्या आत्महत्याचे गूढ कायम

Amravati News : नल-दमयंती सागर झाला अबोल! पक्षिमित्रांना लागली चिंता, दुष्काळाचे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT