नाशिक

जिल्ह्यात ‘जलसंधारणा’वर भर

CD
जिल्ह्यात ४२ हजार ६११ जलतारा ६१ हजार जलसंधारण कामांचे नियोजन, ग्रामीण मजुरांना रोजगाराची संधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत ६१ हजार २१५ जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये ४२ हजार ६११ जलतारा उभारण्याचे नियोजन असून, या कामांमुळे पाणीसाठा वाढण्यासह ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यंदा पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामही घटण्याची शक्यता असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर संकट उभे राहिले आहे. राज्य सरकारने तेरा तालुक्यांत दुष्काळ निवारणासाठी १२ उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र, संकटाची तीव्रता लक्षात घेता जलसंधारणाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन केले आहे. जलतारांसह वनराई व सिमेंट बंधारे, दगडी बांध, शेततळी, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, माती नालाबांध, गाळ काढणे, भूमिगत बंधारे, तलावांचे पुनरुज्जीवन आणि पावसाचे पाणी साठविण्याच्या कामांचा यात समावेश आहे. या कामांमुळे पावसाचे पाणी अडविणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करण्यास मदत होणार आहे. आदिवासी तालुक्यांत वनराई बंधाऱ्यांना प्राधान्य पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या डोंगराळ व आदिवासीबहुल तालुक्यांत जलतारा प्रकल्प राबविताना भौगोलिक अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागांत वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीवर भर देण्यात येत आहे. पेठ तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आतापर्यंत १६३ वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे ६ कोटी ७ लाख २ हजार लिटर पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. कोट दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकसहभागातून गावोगावी कामे हाती घेण्यात येत आहेत. सामाजिक संस्था, संघटना आणि कंपन्यांनी सीएसआर निधीच्या माध्यमातून या उपक्रमाला आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. - सीमा अहिरे, उपजिल्हाधिकारी (व्हीबी जी राम जी) तालुकानिहाय प्रस्तावित जलसंधारण कामे बागलाण (४५५०), चांदवड (९८५), देवळा (२०३०), दिंडोरी (४३२२), इगतपुरी (१४४४), कळवण (३३७२), मालेगाव (२१४२०), नांदगाव (३४०६), नाशिक (५२५), निफाड (१७६४), पेठ (३१६०), सिन्नर (३७७९), सुरगाणा (१४५९), त्र्यंबकेश्‍वर (४९१४), येवला (४०८५), एकूण (६१२१५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT