नाशिक

विटनेर येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

CD
टुडे ३, ॲन्कर ---- लोगो : प्रेरणादायी --- NSK26H34199 जळगाव : जिल्ह्यातील विटनेर येथे केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्प व भूजल विकास यंत्रणेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यात श्रमदान करताना ग्रामस्थ. ---------- विटनेर येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती उपशीर्षक श्रमदानातून जलसंधारणाचा प्रभावी संदेश; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्प आणि भूजल विकास यंत्रणा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विटनेर येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. ग्रामस्थांनी श्रमदानातून जलसंधारणाचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला बळ देणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा उभारला. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमासाठी विटनेरच्या सरपंच श्रीमती नेहा ललित साठे, उपसरपंच अर्चना संजय जाधव, भूजल विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्षा जैन, मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता राहुल मनकर, पाणी फाउंडेशनचे समन्वयक राजेश हिवरे, समग्र कृषी विकासचे व्यवस्थापक आदित्य सावळे, ग्रामपंचायत कर्मचारी कुंतेश ठोंबरे, सदस्य उपस्थित होते. यांचा होता सहभाग कामाच्या यशस्वितेसाठी गावातील तरुण युवक भूषण राजगिरे, चेतन साबळे, बबलू पिंजारे आणि राहुल जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. बंधाऱ्यासाठी आवश्यक गोण्यांची उपलब्धता बीटा कन्स्ट्रक्शन यांच्याकडून करून देण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, प्रतिष्ठानचे सचिव दिलीप चोपडा, शिवाजी भोईटे यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि श्रमदानातून साकारलेला हा वनराई बंधारा ग्रामीण भागातील जलसंधारण चळवळीला प्रेरणा देणारा ठरणार असून, लोकसहभागातून जलसंवर्धनाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

SCROLL FOR NEXT