नाशिक

ऐन हिवाळ्यात ८४ हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा

CD
ऐन हिवाळ्यात १३१ गाव-वाड्यांना टंचाईच्या झळा जिल्ह्यात ४३ टँकरने भागतेय ८४ हजार नागरिकांची तहान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : ऐन हिवाळ्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे चार तालुक्यांतील ४२ गावे आणि ८९ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या १३१ गाव-वाड्यांतील ८४ हजार ५०२ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला ४३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही स्थानिक पातळीवर अपुऱ्या पावसामुळे नोव्हेंबरच्या मध्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. देवळा, चांदवड, मालेगाव आणि येवला या चार तालुक्यांतील ग्रामीण भागाला त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अनेक गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सध्या ४३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, दिवसभरात या टँकरच्या ८० फेऱ्या होत आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने १४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यापैकी एक विहीर गावासाठी राखीव ठेवण्यात आली असून, उर्वरित १३ विहिरींमधून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाढते तापमान आणि पाण्याची घटती उपलब्धता यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन मागणीनुसार टँकर उपलब्ध करून देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सद्यःस्थिती तालुका गावे-वाड्या टँकर चांदवड..........०९..........०५ देवळा..........२०..........०३ मालेगाव..........२०..........०६ येवला..........८२..........२९ एकुण..........१३१..........४३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT