Water Crisis Sakal
नाशिक

Water Crisis: टंचाई मराठवाड्यात धडकी मात्र नाशिकमध्ये! कालव्यांना पाणी सोडल्याने 37 टक्क्यांच्या खाली पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Crisis : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा असला तरी मराठवाड्यातील जायकवाडी धरणामधून कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने तेथील पाणीसाठा ३७ टक्क्यांच्या खाली येणार आहे.

त्यामुळे मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार गंगापूर धरणात ६१ टक्के पाणीसाठा ठेवावा लागणार आहे. उर्वरित पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागणार असल्याने टंचाई मराठवाड्यात असली तरी धडकी मात्र नाशिकला भरली आहे.

पाटबंधारे विभागाकडूनदेखील शासनाने धरणांच्या पाण्याची टक्केवारी मागविल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.

दरम्यान, महापालिकेने वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने या वर्षी ३०० दशलक्ष घनफूट अधिक पाण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदविली आहे. (Water Crisis Scarcity in Marathwada but in Nashik Water storage below 37 percent due to release of water to canals nashik)

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा या तीन धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. गंगापूर धरणातून शहराला अधिकाअधिक पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरण समूहात जवळपास ९० टक्के पाणीसाठा आहे.

हा पाणीसाठा वर्षभर पुरेल इतका आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. परंतु धरणातील समाधानकारक पाण्याच्या टक्केवारीचा आनंद दीर्घकाळ टिकणारा नाही.

त्याला कारण म्हणजे, मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात कमी होणारा पाणीसाठा हे होय. सद्यःस्थितीत जायकवाडी धरणात ३७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार ३७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असेल, तर वरच्या धरणांमध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात ८१ टक्के पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. परंतु सद्यःस्थितीत मराठवाड्यातील कालव्यांना जायकवाडीमधून पाणी सोडले जात आहे.

त्यामुळे धरणातील पाण्याची टक्केवारी कमी होऊन ३५ टक्क्यांपर्यंत हा साठा स्थिरावल्याचे बोलले जात आहे. पाण्याची कमी होणारी टक्केवारी नाशिककरांना धडकी भरवणारी आहे. ३७ टक्क्यांच्या खाली पाणीसाठा आल्यास गंगापूर धरणात ६१ टक्के पाणीसाठा ठेवावा लागेल.

याचाच अर्थ नाशिककरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाण्याची टक्केवारी मागितल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

जायकवाडीतील पाणीसाठ्याची घटती टक्केवारी नाशिकप्रमाणेच नगर जिल्ह्यालादेखील डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

असा आहे टक्केवारीचा रेशो

- टप्पा एक ः जायकवाडी धरणामध्ये ३७ टकके पाणीसाठा असल्यास मुळा धरण समूहात ४९ टक्के, प्रवरा ५५ टक्के, दारणा धरण समूहात ५४ टक्के, पालखेड धरणात ७३ टक्के, तर गंगापूर धरणात ६१ टक्के पाणीसाठा ठेवावा.

- टप्पा-२ व ३ ः जायकवाडी धरणात ५४ टक्के ते ६५ टक्के पाणीसाठा असेल, तर मुळा धरण समूहात ६५ ते ७९ टक्के, प्रवरात ७९ ते ९३ टक्के, धरणात ८४ ते १०२ टक्के, पालखेड ७३ ते ८२ टक्के, गंगापूर धरण समूहात ७४ ते ८२ टक्के पाणीसाठा ठेवावा.

महापालिकेकडून अतिरिक्त पाण्याची नोंदणी

- २५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धरणातील साठ्याचा आढावा घेऊन पाण्याची मागणी नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गंगापूर धरणातून ४४००, दारणा धरणातून शंभर, तर मुकणे धरणातून १७०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी महापालिकेने नोंदविली आहे.

वॉटर ऑडिटनुसार शहराची लोकसंख्या साडेबावीस लाखांच्या वर असल्याने तो आकडा गृहीत धरून महापालिकेने मागील वर्षाच्या तुलनेत अतिरिक्त ३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT