Women wandering for water despite being close to the dam. In the second photograph, a woman from Kurungwadi fills the seepage water. esakal
नाशिक

Water Crisis: आदिवासी भागात पाण्यासाठी महिलांची पायपीट; इगतपुरी तालुक्यातील वाड्यापाड्यांवर मे महिन्यातच झळा!

पोपट गवांदे

Water Crisis : तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात लहान मोठी मिळून सोळा धरणे असूनही मे महिन्यातच आदिवासी पाड्यांवरील महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

कुरुंगवाडी हा आदिवासी पाडा असून भावली धरणापासून अगदी जवळच आहे. मात्र येथील महिलांना जंगलातून पायपीट करत डोंगर दऱ्यातील कपारीतून डबक्यात झिरपणारे पाणी प्यावे लागत आहे. धरण उशाला अन्‌ कोरड घशाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (Water Crisis Women struggle for water in tribal areas Igatpuri taluka castles in month of May nashik news)

तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. जवळपास ४ हजार मिलिमीटर पावसाची नोंद दरवर्षी पावसाळ्यात होत असते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी तालुक्यात लहान मोठी मिळून १६ धरणे बांधली आहेत.

तरी देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था छोटी खेडी व वाड्यापाड्यांवर होऊ शकलेली नाही. त्यामुळे इगतपुरीतील हे भीषण वास्तव कधी मिटणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. खुद्द इगतपुरी शहरात गेल्या दहा वर्षापासून आठवड्यातून केवळ तीन दिवस पाण्याचा पुरवठा केला जातो.

तर शहरातील खालची पेठ परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक नागरिकांना पाणी मिळत नाही. तालुक्यातील कुरुंगवाडी हा आदिवासी पाडा भावली धरणापासून जवळच आहे. दरवर्षी वाड्यापाड्यांतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, याकडे कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही अशी स्थिती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाण्याच्या शोधासाठी भटकंती

नावालाच धरणांचा जिल्हा, हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागते. इगतपुरीत पाण्याची टंचाई आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय तालुक्यातील महिलांना दरवर्षी येतो. पाण्यासाठी डोंगरदऱ्या कड्या-कपाऱ्यांवर अक्षरशः पाण्याचा शोध घ्यावा लागतो.

"काही ठिकाणी तर अक्षरशः दगडांमधून झिरपणाऱ्या पाण्याच्या थेंबांची साठवण करून हंडा भरला जातो. त्यामुळे त्यासाठी कमीत कमी एक ते दोन तास एका महिलेला लागतो. सर्व महिलांचे पाण्याचे हंडे भरले की सर्व महिला घराची वाट धरतात."- भगूबाई तेलम, ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT