Water Tanker esakal
नाशिक

Water Management : पस्तीस हजारांवर लोकसंख्येला टँकरने पाणी! येवला, चांदवड, बागलाण तालुक्यांत टँकरची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Water Management : उन्‍हाच्या वाढत्या झळांमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली असून, टँकरची मागणी सुरू झाली आहे. जिल्हाभरातील सुमारे ३६ हजारांहून अधिक लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

येवला, चांदवड आणि बागलाण अशा तीन तालुक्यांत टँकरची मागणी वाढली आहे. (Water Management Thirty five thousand population with tanker water Demand for tankers in Yeola Chandwad Baglan talukas nashik news)

शहर जिल्ह्यात २५ गावे आणि नऊ वाड्यांसह ३४ ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी सुरू झाली आहे. साधारण ३६ हजार ३७४ लोकसंख्येला २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक १५ टँकर येवला तालुक्यात सुरू आहेत.

१९ गावे व सात वाड्यांवर सात शासकीय व सहा खासगी अशा १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. रोज साधारण १५ टँकरच्या फेऱ्यांतून हा पाणीपुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल चांदवड तालुक्यात पाण्याच्या टँकरची मागणी आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पाच गावे आणि एक वाडी अशा सहा ठिकाणी तीन शासकीय टँकरद्वारे ११ हजार दहा लोकसंख्येला १२ टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. बागलाण तालुक्यात एक गाव आणि एका वाडीवरील एक हजार १८६ लोकसंख्येला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

लवकरच विहीर अधिग्रहण

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढू लागली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही तालुक्यात विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या नाहीत. वाढत्या मागणीनुसार टँकरची संख्या वाढेल, तशी गरजेनुसार विहिरींच्या अधिग्रहणाची तरतूद असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT