नाशिक

सात मोटारी जप्त

CD
धुळे ः टुडे ३ साठी --- शेतातील सात मोटारी जप्त; चोरीप्रकरणी चौघे ताब्यात सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ ः वरखेडी (ता. धुळे) शिवारातील शेतातून पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या चौघांना धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३१ हजारांच्या सात पाण्याच्या मोटारी जप्त केल्या. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. विलास श्यामराव पाटील यांच्या वरखेडी शिवारातील शेतगट क्रमांक ५५/४ मधील पत्र्याच्या शेडमधून १४ जुलैच्या सायंकाळी ते १५ जुलैच्या सकाळी पाण्याची मोटार व अन्य साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना संशयित गणेश वसंत भिल (वय २४), सागर रणजित भिल (वय २२), सोमनाथ ऊर्फ अजय नाना भिल (वय २३) आणि आनंद हरी मोरे (वय २१, सर्व रा. वरखेडी, ता. धुळे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी परिसरातील शेतातून पाण्याच्या मोटारी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक रविकुमार पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रभावती कापसे व पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT