Water is flowing over the head with bare feet like a child for water esakal
नाशिक

Water Scarcity : धरणांच्या तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा; आवळखेड परिसरात पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा

घोटी (जि. नाशिक) : आदिवासी बांधवांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची स्थिती आहे. प्रशासन मात्र टँकर मागणी कमी कशी करता येईल यावर ठाम भूमिका निभावताना दिसत आहे. नागरिकांची काळजी घेताना प्रशासनाचे नेहमीच वराती मागून घोडे हे काही आदिवासींना नवे नाही.

लहान बालकांपासून ते वृद्ध युवक-युवती दीड-दोन किलोमीटर वरून डोंगर चढून उतरून पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहे. यामध्ये चिमुकल्यांचे आयुष्य अनवाणी पायाने उन्हातान्हात करपून जाताना दिसत असून धरणांच्या तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा अशी म्हणण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे.

इगतपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आवळखेड ग्रामपंचायत मधील हे विदारक चित्र नागरिकांपुढे उभे ठाकले आहे. गावाच्या पायथ्याशी डोंगर उतारावर तीन विहिरी आहेत. दरवर्षी विहिरींना तळ गाठल्यावर टँकर सुविधा उपलब्ध करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षीत असताना तसे दिसत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Water scarcity in taluka of dams Water shortage in Avalkhed area nashik news)

विहिरींना तळ गाठला म्हणून पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी ते अपुरे पडेल व ग्रामस्थ पाणी कमी प्रमाणात वापरतील यासाठी ती बंद करण्यात आली, असे असेल तर टँकर सुविधा उपलब्ध करून तातडीने विहिरीत पाणी टाकल्यास सर्व वाड्यापाड्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध होईल. मात्र अजूनही प्रशासनाने टँकर मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केलेला दिसत नाही हे विशेष म्हणावे लागेल.

रोजगार सोडून पाण्यासाठी धाव

पाणी टंचाई बाबत अनेक प्रयत्नांनी अनेक वर्षांनी का होईना पाणीपुरवठा योजना मंजूर झाली खरी मात्र, तिलाही घरघर लागल्याने आदिवासी बांधवांना रोजगार सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे लहान बालके देखील घरातील मिळेल ते साहित्य घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

"दरवर्षी मार्च महिन्यापासून डोक्यावर पाणी वाहावे लागते. टँकर प्रस्ताव का पाठवला जात नाही. याचे कोडे आम्हाला अजून उलगडलेले नाही. तातडीने टँकर सुविधा उपलब्ध करावी अशी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडे करत आहे." - नामदेव कामडी, ग्रामस्थ आवळखेड

"घरातील कामधंदा आटपून कधी पाणी भरायचे व कामाला जायचे यामुळे वैतागले आहे. पाणीपुरवठा बंद करून ठेवला आहे. विहिरीत पाणी कमी असल्याचे सांगितले जाते. मग टँकर वेळेत सुरू करण्यास का उशीर लावला जातोय." - सुमनबाई भस्मे, ग्रामस्थ आवळखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT