टुडे पान १ साठी
--------
(नळाचा फोटो वापरावा)
---
पालिका, नगरपरिषदांनाही दहा टक्के पाणीकपात लागू
सिंचन प्रकल्पातील पाणी चोरी रोखण्यासाठी पथकांची नेमणूक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : जिल्ह्यात यंदा ‘एल निनो’मुळे २३ टक्के पावसाची तूट आहे. अल्प पावसामुळे भूजल पातळीतही घट झाली असून, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून जून २०२७ पर्यंत पाणी पुरविण्यासाठी सर्व पालिका, नगरपरिषदा, पंचायती, महापालिकेला दहा टक्के पाणी कपातीचे आदेश लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सातही उपविभागांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १२ स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे. वाघूर, हतनूर, गिरणा यांसह जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील जलसाठ्याची चोरी रोखण्यावरही प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पाटबंधारे विभागातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या १२ पथकांमध्ये पाटबंधारे विभागाचे अभियंते, शाखाधिकारी, कालवा निरीक्षक, मदतनीस कर्मचारी, पोलिस आणि वायरमन यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमधील पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठीही या पथकांना जबाबदारी देण्यात आली आहे. वाघूर, तोंडापूर, चिंचपाणी, हतनूर, सुकी, अभोरा, तापी डावा व उजवा, बोरी, गिरणा आणि अंजनी या प्रकल्पांमधील जलसाठ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
--------
चौकट
पाणीटंचाईबाबत उद्या बैठक
दरम्यान, जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १९) संबंधित पालिकांचे मुख्याधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात अजून पाणी बचतीबाबत, कपातीबाबत उपाययोजना व आगामी दिशा ठरविली जाणार आहे.
-----------
कोट
सर्व पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदांना शाासनाच्या आदेशानव्ये पाणीकपातीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. पाणी जून २०२७ पर्यंंत पुरविण्याचे मोठे आव्हान असले तरी विविध उपाययोजना करीत आहोत.
जर्नादन पवार, प्रशाासन अधिकारी
नगरपालिका विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.