नाशिक

साडेसातशेहून अधिक गावे टंचाईच्या छायेत

CD
टुडे एक : मेन फिचर समर्पक फोटो वापरावा. --- साडेसातशेहून अधिक गावे टंचाईच्या छायेत (उपशीर्षक) पहिल्‍या टप्‍प्‍यात २५ गावांचा समावेश; पावसाचा मोठा खंड पडल्‍याचा परिणाम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला. त्यात संभाव्‍य ७५५ गावांचा समावेश असून, पुढील काळात गावांच्‍या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्‍यान, ऑक्‍टोबरच्‍या अखेरपासून टंचाई निवारणासाठी उपाययोजना केल्या आहेत. यंदा पावसाच्‍या पडलेल्या दीर्घ खंडाचा परिणाम खरीप पिकांवर झाला. परतीचा पाऊसही समाधानकारक न झाल्याने आगामी उन्हाळ्यात पाणी उपलब्धतेचे आव्हान आणखी वाढण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि पशुधनासाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी उन्‍हाळ्यात म्‍हणजे मार्चपासून संभाव्‍य पाणीटंचाई आराखडा केला जातो. यंदा मात्र ऑक्‍टोबरपासूनच याचे नियोजन करावे लागले आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यातच २५ गावे जिल्ह्यात दरवर्षी चाळीसगाव, अमळनेर आणि जामनेर तालुक्यांत पाणीटंचाईचे सावट अधिक असते. यंदा मात्र सहा ते सात तालुक्यांत टंचाईची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. चोपडा, पारोळा, जामनेर, पाचोरा यांसह अन्य तालुक्यांतही पाणीटंचाईचे संकट जाणवू शकते. त्‍यानुसार टंचाई आराखडा केला जात असून, यात पहिल्‍या टप्‍प्‍यात म्‍हणजे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्‍यांसाठी २५ गावांचा समावेश आहे; तर जानेवारी ते मार्चमध्ये २६० गावे व एप्रिल ते जूनदरम्यान ४७० गावांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. ‘जलजीवन’च्या योजनाही रखडलेल्‍या जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या एक हजार ३०० हून अधिक योजनांपैकी अनेक योजनांची कामे निधीअभावी रखडली आहेत. नऊशे योजनांची कामे ५० टक्क्यांपर्यंत झाली असून, काही योजनांची प्रगती ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित निधी वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेकडून योजनांसाठी निधीची मागणी केली आहे. इन्‍फो टंचाई आराखडा १० ते १२ कोटींपर्यंत यंदाचा टंचाई आराखडा सुमारे १० ते १२ कोटी रुपयांचा राहण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांत टंचाई आराखड्यातील गावांची संख्या कमी होत होती. गेल्या वर्षी पाच कोटींचा टंचाई आराखडा होता. अधिक पावसामुळे टंचाई न जाणवल्याने साधारण दोन कोटींचा खर्च झाला होता. मात्र, यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे पुन्हा टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची चिन्हे असल्‍याने संभाव्‍य टंचाई आराखडा १२ कोटींपर्यंत राहण्याची शक्‍यता असल्‍याचे जिल्‍हा परिषदेच्‍या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COP31 Climate Summit Collapse Turkey : तुर्कीयेमधील संयुक्त राष्ट्रांची 'कॉप ३१' हवामान परिषद फिस्कटली! जीवाश्म इंधनांच्या मुद्द्यावरून मोठे मतभेद, मुख्य कराराविनाच चर्चा संपली

Manoj Jarange: मनोज जरांगें पुन्हा आक्रमक! ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा; मराठा बांधवांना काय केले आवाहन?

Latest Marathi News Live Update : पुण्यात अतिक्रमण हटवताना महापालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक; सय्यदनगर-हांडेवाडीत तणाव

५ डिसेंबरला केतूचं राशीपरिवर्तन! पुढील १८ महिने ३ राशींची चांदी; बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार

Nashik Kumbh Mela Song Ajay Atul : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची धून अजय-अतुल बांधणार! मुख्य गीतासाठी १ कोटींचा निधी मंजूर; निविदेविना थेट निवडीची सर्वत्र चर्चा

SCROLL FOR NEXT