नाशिक

तीन दलघमी साठा मंजूर

CD
धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन -- ‘गिरणा’चा तीन दलघमी साठा मंजूर - आमदार भदाणे : धुळे तालुक्यात रब्बी, टंचाई निवारणाला मदत सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : गिरणा, वाघूर आणि हातनूर या तीन प्रमुख प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता. ६) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. त्यात धुळे तालुक्यातील नाणे, सिताणे, तरवाडे, मोरदड, मोरदड तांडा, खोरदड, खोरदड तांडा, चांदे आणि विंचूर-शिरूड आदी गावशिवारांमधील रब्बी पिके आणि पाणीटंचाई निवारणासाठी गिरणा धरणातून अतिरिक्त ३ दशलक्ष घनमीटर जलसाठा देण्याचे नियोजन मंजूर करण्यात आले आहे. याकामी पाठपुराव्याला या निर्णयातून यश आल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले. - बैठकीत आमदार भदाणे यांनी दुष्काळी स्थितीतील पाणी व चाराटंचाईची तसेच रब्बी हंगामाची वस्तुस्थिती आक्रमकपणे मांडली. त्यांच्या या मागणीला बैठकीस उपस्थित जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कालवा सल्लागार समितीने सकारात्मक मंजुरी दिली. - पाणी आरक्षणाचे नियोजन हातनूर धरणाचे पाणी शंभर टक्के पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच वाघूर धरणाचे एक आवर्तन रब्बी सिंचनासाठी देण्याचे नियोजन झाले आहे. गिरणा धरणाचे एक आवर्तन रब्बी हंगामासाठी निश्चित करण्यात आले असून, उर्वरित पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गिरणा धरणाच्या मंजूर कोट्यापैकी सिंचनासाठीच्या एका आवर्तनातून आमदार भदाणे यांच्या विशेष मागणीनुसार अतिरिक्त ३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. धुळे तालुक्यातील संबंधित गावांना हे पाणी मुख्य पाटचाऱ्या आणि उपपाटचाऱ्यांद्वारे मिळणार आहे. यामुळे नाणे, सिताणे, तरवाडे, मोरदड, खोरदड, चांदे व विंचूर-शिरूड परिसरातील रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे आमदार भदाणे यांनी सांगितले. - १४-१ ...कोट... १४-१ फोटो क्रमांक ः 34679....राम भदाणे १४-१ दुष्काळी स्थितीत रब्बी हंगाम वाचवण्यासाठी अतिरिक्त पाण्याची गरज असल्याचा आग्रह धरला. त्यास शासनाकडून त्वरित मंजुरी मिळाल्यामुळे पाटचाऱ्यांमधून पाण्याचा विसर्ग होणार आहे. बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उर्वरित पाण्याचेही नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आहे. - राम भदाणे, आमदार, धुळे ग्रामीण

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT