नाशिक

वर्मा कुटुंबाकडून सामाजिक बांधिलकी जपत देवच्या वाढदिवशी शाळांना ‘जलसंजीवनी’! सुविधा,विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

CD
पान ३ ॲंकर करणे ------ YEO26B27062 नांदेसर : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बोअरवेलचे उद्घाटन करताना उद्योजक सम्राट वर्मा, हिमांशी वर्मा व शिक्षक,ग्रामस्थ. ----------- वर्मा कुटुंबाकडून बांधिलकी जपत शाळांना ‘जलसंजीवनी’ ---------- दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नांदेसर, आडगाव, कोकमठाणमधील शाळांना मोफत बोअरवेल विद्यार्थ्यांना वाटप ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ८ : वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची किनार देत येवल्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांनी चिमुकल्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुष्काळग्रस्त शाळांतील विद्यार्थ्यांना अनोखी ‘जलभेट’ दिली. नांदेसर,आडगाव आणि कोकमठाण येथील शाळांना बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा कायमस्वरूपी आधार तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत वर्मा कुटुंबाने वाढदिवसाला समाजोपयोगी उपक्रमाची नवी दिशा दिली. सम्राट वर्मा यांचे चिरंजीव देव यांच्या वाढदिवसानिमित्त गाजावाजा न करता त्यांनी विधायक कामावर भर दिला. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शाळांना पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांना गावात पाणी योजना असली तरी नळ घेण्यापासून अनेक अडचणी येतात. अशा स्थितीत अनेक शाळांनी लोकवर्गणीतून पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या तिन्ही ठिकाणी बोअरवेल खोदून दिले असून त्यासाठी आवश्यक जलपरी व इतर साहित्य देऊन गुरुवारी शुभारंभ सम्राट वर्मा, त्यांच्या पत्नी हिमांशी वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. ​बोअरवेलसोबतच त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा यासाठी डिजिटल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित शाळांमध्ये सुशोभीकरणाची कामेही करून दिली असून शाळेच्या भितीवर अध्यापनयुक्त सजावट केल्याने या भिंती बोलू लागल्या आहेत. गावाकडच्या शाळेला मिळालेल्या या भेटीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद दिसून आला. ----------- कोट देव आज दोन वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाच्या माध्यमातून इतर मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल घडावे, हाच आमचा प्रामाणिक हेतू होता. - हिमांशी वर्मा, येवला. --------- सर्वत्र सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आडगाव आणि नांदेसर येथे पाण्याचा प्रश्न सोडवून शालेय साहित्याचे वाटप केले. पाण्याचा प्रश्न सुटल्याने या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसला. भविष्यातही वर्मा कुटुंब आणि सम्राट वर्मा ग्रुप फाउंडेशनकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. - सम्राट वर्मा, उद्योजक, येवला ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

SCROLL FOR NEXT