KPD26B13620
कापडणे : मनोहर पाटील यांच्या शेतात पडून राहिलेले कलिंगड.
--------
कापडणे परिसरातील कलिंगड उत्पादक संकटात
बागा सोडून देण्याची वेळ; पाण्याची कमतरता अन् कमी भावाचाही फटका
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ८ : परिसरातील कलिंगडाच्या बागांना सततच्या वातावरण बदलाचा, पाण्याची कमतरता आणि कमी भावाचा फटका बसत आहे. अचानक वाढणारी थंडी, दव, ढगाळ वातावरण आणि अचानक वाढलेली उष्णता आदींमुळे पिकावर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटले असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांवर बागा सोडून देण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीत पाणी वाचवून, काटकसरीने सिंचन करून कलिंगड बागा जगवल्या होत्या. मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून उभी केलेली बाग आता डोळ्यादेखत वाया जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. औषध फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले. कलिंगडाच्या बाजारभावानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. बांधावर कलिंगड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सध्या कलिंगडाला प्रतिकिलो केवळ ५ ते ६ रुपये भाव मिळत आहे. हा भाव काढणी, वाहतूक आणि मजुरीचा खर्चही भरून काढणारा नाही. अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड काढणीच बंद केली आहे.
काही शेतकऱ्यांनी बागायत सोडून दिली आहे. शेतातच कलिंगड सडत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. पाणी, खते, औषधे, बियाणे आणि मजुरी यावर हजारो रुपये खर्च झाला. मात्र, हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. धुळे तालुक्यात कापडणे, धनूर, न्याहळोद, सोनगीर, नगाव, देवभाने, कुसुंबा परिसरात मोठ्या प्रमाणावर कलिंगड लागवड होते. या भागातील शेतकऱ्यांसाठी कलिंगड हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र, यंदा निसर्ग आणि बाजार दोघांनीही दगा दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.