Watermelon  esakal
नाशिक

एकाच शेतात टरबुजाचे दुबार पिक

खंडू मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : येथील टरबूज उत्पादक शेतकऱ्याने टरबुजाचे दुबार पिक घेत चांगले उत्पादन घेतल्याने या शेतकऱ्याच्या प्रयोगाचे कौतूक होत असून, महिन्याभरापूर्वी टरबूज मातीमोल भावात विक्री झाले असले तरी आताच्या पिकातून सध्या चांगला फायदा होत आहे.

देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात सर्वच भागात उन्हाळ हंगामातील टरबूज पिक घेतले जाते. उन्हाच्या तीव्रतेमुळे टरबूज पिकाला सर्वत्र चांगली मागणी असल्याने कसमादे भागात मोठ्या प्रमाणावर टरबूज लागवड होत असते. मात्र, एकदा पिक काढून झाले की या ठिकाणी दुबार पिक जवळपास येतच नाही. पिक काढून या ठिकाणी अनेक शेतकरी एकतर दुसरे पिक घेतात नाही तर नांगरणी करून जमीन पडीक ठेवतात. मात्र, खामखेडा येथील शेतकरी नंदू बच्छाव यांनी पहिल्यांदा टरबूज काढलेल्या जागेवरच दुसऱ्यांदा टरबूज लागवड यशस्वी उत्पादन घेतले आहे.

सुरवातीला १० जानेवारीला त्यांनी ४० गुंठ्यावर टरबुजाची लागवड केली होती. या क्षेत्रासाठी सुरवातीला त्यांना शेणखत, मशागत, पेपर मल्चिंग, लागवड, रासायनिक खतांसाठी ४५ ते ५० हजार रुपये खर्च आला. लागवडीनंतर हे पिक ७० दिवसात काढणीला आले.

मार्च महिन्यात टरबूज पिकाला चांगला भाव असल्याने त्यांच्या ४० गुंठ्यातील क्षेत्रावर ३५ टन उत्पादन घेतले. साडेअकरा रुपये दराने व्यापाऱ्याने बांधावर खरेदी केल्याने या पिकातून त्यांना खर्च वजा जाता पावणेतीन लाखाचे उत्पादन झाले. सदर पिक काढल्यानंतर लगेचच त्यांनी पहिल्या पिकाचे वेल, तण काढून या ठिकाणी दुबार टरबुजाची लागवड करण्याचे ठरवले. तयार रोपांपेक्षा त्यांनी दुसऱ्यांदा बियाण्याची निवड केली. दुसऱ्यांदा ४ एप्रिलला थेट बियाणे लागवड केली. या पिकाची चांगली निगा राखत त्यांनी टरबुजाचे यशस्वी उत्पादन काढून दाखवले. दुबार पिकासाठी त्यांना फक्त बियाणे व रासायनिक खतांसाठी २० हजार रुपये खर्च आला. दुपार पिकातून त्यांनी २० टन उत्पादन घेतले आहे. याला ८ रुपये दर मिळाला असून, खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.

दुबार पिकास खतांची चांगली मात्रा दिल्यामुळे पिकाने चांगला फुटवा केला. चांगली फळधारणा झाल्याने सुरवातीच्या पिकापेक्षा थोडे उत्पादन कमी आले. मात्र, उत्पादन खर्चात ३० ते ३५ हजार रुपयांची बचत झाली. या शेतकऱ्याला चाळीस गुंठ्यात १३० दिवसात साडेचार लाखाचे उत्पादन झाले. त्यामुळे त्यांच्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांना वडील नामदेव बच्छाव यांचे मार्गदर्शन, भाऊ दत्तात्रय बच्छाव, पुतण्या लकी बच्छाव, कुलदीप शिरोळे यांचे सहकार्य लाभले.

खर्चाची बचत

दुबार उत्पादन घेताना दुसऱ्यांदा पिकांच्या अंतर्गत मशागतीचा खर्च निम्याहून कमी झाला. रोपे तयार करण्यासाठीचा खर्च, लागवडीचा खर्च, खतांचा खर्च, दुबार पिक घेताना वाचला. दुबार पिकाला सुरु पिकाच्या तुलनेत पन्नास टक्के खर्च व ९० टक्के दगदग कमी झाली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT