ramdas-athawale.jpg 
नाशिक

सहा वर्षांत आठवलेंच्या संपत्तीत चक्क ''इतकी'' वाढ!

संपत देवगिरे

नाशिक : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबाची वांद्रे येथील बंगल्यासह मुंबईत तीन व दिल्लीला एक घर आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या एकत्रीत संपत्तीत सुमारे १.१२ कोटींची वाढ झाली आहे.

राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल

रामदास आठवले यांनी काल भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र त्यांच्यावर गुन्हेगार खटला व शिक्षा झालेली नाही. त्यांचे शिक्षण बारावी पास आहे. आठवले यांचे मुळगाव कवठे महाकाळ तालुक्यातील ढालेवाडी असून त्याच्याकडे वडीलोपार्जीत १० गुंठे जमीन आहे. याशिवाय त्यांच्याकडे डहाणू येथे सुमारे बारा एकर शेती आहे. पुण्यात मावळ येथे त्याच्याकडे एक एकर ४ गुंठे जमीन आहे. श्रीमती सीमा आठवले यांच्याकडे मुंबईत वांद्रे येथे सुमारे दोन हजार चौरस फुट बांधकाम असलेला निवासी बंगला आहे. हा बंगला २०१४ मध्ये रामदास आठवले यांच्या नावे होता. तो बक्षीस मिळाले असल्याचे प्रतिज्ञापत्र नमुद असल्याने त्याचे मूल्य नमूद केलेले नाही. याशिवाय चारकोप कांदिवली आणि नवी दिल्लीत सदनिका आहे.

मात्र त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही

श्री आठवले यांच्याकडे मालाड येथे ५५० चौरस फुटांची सदनिका आहे. या ठेवी, रोकड, सोने आदींचे एकत्रीत मुल्यांकन ३.९१ कोटी रूपये आहे. रामदास आठवले यांनी २०१४ मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या विवरणात २.७९ कोटींची संपत्ती जाहीर केली होती. यंदा ती ३.९१ कोटी आहे. त्यांच्याकडे ३.१९ लाखांचे ७२ ग्रॅम सोने आहे. पत्नी सीमाताई यांच्याकडे ९.९७ लाखांचे २२५ ग्रॅम आणि मुलगा जीत याच्याकडे ४.४३ लाखांचे १०० ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे विविध बॅंकेतर्फे ९.०१ लाख, पत्नीचे ३.५२ लाख व मुलगा जीतकडे १.१० लाख रक्कम आहे. पोस्टात ४.५३ लाख गुंतवणूक आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT