Weather Forecast rain
नाशिक

Weather Forecast : जिल्ह्यात आज अन मंगळवारसह बुधवारी हलक्या पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Weather Forecast : जिल्ह्यातील काही भागामध्ये शनिवारी (ता. २७) आणि मंगळवारी (ता. ३०), बुधवारी (ता. ३१) हलक्या पावसाचा अंदाज इगतपुरीच्या विभागीय ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे.

रविवारी (ता. २८) आणि सोमवारी (ता. २९) हवामान उष्ण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमान कमाल ३५ ते ३९ आणि किमान २१ ते २३ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला १५ ते २५ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. (Weather Forecast Light rain expected in district today and on Tuesday and on Wednesday nashik news)

हलक्या पावसापासून मळणी अथवा उन्हात वाळवण्यास ठेवलेले पिके-धान्य, पशुधन, कोंबड्या आणि स्वतःचे संरक्षण करावे. दरम्यान, खरीप बाजरी, सोयाबीन, नाचणी व खुरासणी आदी पिकांसाठी पूर्व मशागत करावी.

जमिनीची दोन ते तीन वर्षात किमान एकदा उन्हाळ्यामध्ये एक खोल नांगरणी करून, नांगरणीच्या विरुद्ध दिशेने वखराच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोष्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.

शेणखतामुळे जमीन चांगली भुसभुशीत राहते. पिकाच्या मुळ्या खोलवर जाऊन पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते. पेरणीपूर्वी एक वखर पाळी घातल्यास तणांची तीव्रता कमी होते, असे विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे सांगण्यात आले.

जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमीन चांगली तापून त्यामधील जीव-जंतूंचा नाश होऊन खरीप पिकातील तणांचे प्रमाण, कीड व रोगाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भाजीपाला व फळ झाडांमध्ये मल्चिंग करावी.

भाजीपाला पिकाला आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देणे. साठवण करावयाच्या कडधान्यांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ३ ते ५ मिलिलिटर एरंडेल/जवस/करंज/कडुनिंबाचे तेल प्रति किलो धान्य या प्रमाणात वापरावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इगतपुरीत भाताचा इंद्रायणी वाण उपलब्ध

इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रात भाताचा इंद्रायणी प्रमाणित वाणाचे बियाणे आणि युरिया-डीएपी गोळी खत विक्रीसाठी उपलब्ध आहे. किलोला ६५ रुपयांप्रमाणे १६ किलो गोणीचे एक हजार ४०, तर किलोला २५ रुपये प्रमाणे ३५ किलो गोणीचे ८७५ रुपये असा भाव आहे.

शेतकऱ्यांनी भातासह इतर पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत करून माती परीक्षण करून घ्यावी. पेरणीसाठी सुधारित वाण, खते आदी कृषी निविष्ठा खरेदी करावी, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

पुरेशा पावसानंतर करावी पेरणी

मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर सलग तीन ते चार दिवस पुरेसा पाऊस झाल्यावर (६५ ते १०० मिलिमीटर) वापसा आल्यानंतर खरीप पिकांची पेरणी करावी. तसेच उन्हाळी भाजीपाला व फळबागांना शक्यतो सायंकाळी ओले करावे. पिकामध्ये आच्छादनाचा वापर करावा.

उन्हाळी पिकातील जमिनीतील ओलावा टिकण्यासाठी शेतात गवताचे आच्छादन करावे. ठिबक सिंचनाचा वापर करावा. फळपिकांमध्ये खुरपणी करावी. पिकांनी रात्रीचे पाणी द्यावे. उन्हाळी पिके, भाजीपाला व फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करावी, असे इगतपुरीच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT