नाशिक

अकराव्या ऋणानुबंध वधू-वर परिचय मेळाव्याचे नियोजन जानेवारीत आयोजन; नियोजन बैठकीत जबाबदाऱ्यांचे वाटप

CD
NSK26H31395 जळगाव : महाराष्ट्र सुवर्णकार सेना आयोजित ११ व्या ऋणानुबंध वधू-वर व पालक परिचय मेळाव्याच्या नियोजन बैठकीत उपस्थित पदाधिकारी व समाजबांधव. ऋणानुबंध वधू-वर मेळाव्याचे नियोजन महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे जानेवारीत आयोजन; बैठकीत जबाबदाऱ्यांचे वाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ११ व्या ऋणानुबंध वधू-वर व पालक परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक झाली. गोविंद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मेळाव्याच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील तरुण-तरुणींना योग्य वधू-वर निवडीसाठी परिचयाची संधी मिळावी, पालकांना एकाच व्यासपीठावर आणता यावे, तसेच समाजातील कुटुंबांमध्ये सुसंवाद, आपुलकी व ऋणानुबंध वाढावेत, हा मेळाव्याचा उद्देश आहे. बैठकीत विविध समित्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी राकेश अहिरराव, मेळावा प्रमुखपदी राजेंद्र दुसाने, नियोजन समिती प्रमुखपदी पंकज रणधीर, उपप्रमुखपदी दिलीप पिंगळे, सचिवपदी प्रशांत विसपुते, सहसचिवपदी मनोज सोनार, तर प्रसिद्धी प्रमुखपदी रत्नाकर दुसाने यांची निवड करण्यात आली. यावेळी नगरसेविका रंजना विजय वानखेडे, विजय बागूल, जगदीश देवरे व भानुदास येवलेकर यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. चौकट मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार ‘एकी, संघटन, समाजहित’ या भावनेतून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. समाजातील अधिकाधिक वधू-वर व पालकांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, तसेच समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी केले. सूत्रसंचालन रतनकुमार थोरात यांनी केले, तर संजय पगार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT